Thackeray Shivsena and MNS Press Conference : ठाकरे बंधू Thackeray Bandhu एकत्र येण्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून होत आहेत. राज ठाकरे यांनी अभिनेते महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमध्ये यूतीबद्दल बोलल्यानंतर या चर्चांना सुरुवात झाली आहे. आता शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या MNS कामगार सेनेची उद्या एकत्रित पत्रकार परिषद घेणार आहेत. इंडिगो एअरलाइन्स कर्मचाऱ्यांबाबत भाजपच्या कामगार युनियनने केलेला खोटारडेपणा उद्या शिवसेना(UBT)आणि मनसे एकत्रित रित्या करणार उघड करणार आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या पत्रकार परिषदेमध्ये नितीन सरदेसाई देखील राहणार उपस्थित राहणार आहेत. दुपारी 12.30 वाजता प्रादेशिक कामगार आयुक्तालय श्रमरक्षा भवन चुनाभट्टी येथे पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.