थोडक्यात
उद्धव ठाकरेंनी फुंकलं पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग
ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला
भारताला आत्ता खऱ्या पंतप्रधानांची गरज - उद्धव ठाकरे
ठाकरे ब्रँडचा जन्म पुण्यात झाला असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आज (दि.4) पुण्यात सांगितले. एवढेच नव्हे तर, तुमचं आणि आमचं (शिवसेनेचं) नातं खूप जुनं असल्याचे सांगत ठाकरे यांनी आगामी काळात होणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं एकप्रकारे रणशिंग ठाकरेंनी फोडल्याचे मानले जात आहे. यावेळी ठाकरेंनी दसरा मेळावा अभूतपूर्व झाला. दरवाजा बंद करण्याची गरज भाषणं सुरु झाल्यावर वाटली नाही, असा टोला ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.
माझ्या पक्षाचं नाव शिवसेनाच
शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणारे हात महत्त्वाचे आहे. शिवाजी पार्कवर मी भाषण थांबवू का असे विचारले, पण पावसात आणि खाली चिखल असतानाही शिवसैनिकांनी भाषण सुरू ठेवण्याचा आग्रह धरला असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात बोलत आहे. माझ्या पक्षाचं नाव हे माझ्या आजोबांनी ठेवले आहे. त्यामुळे हे नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नसून, माझ्या पक्षाचं नाव शिवसेना आणि शिवनेसाच राहिल असे ठाकरेंनी ठणकावून सांगितलं
उपस्थितांशी संवाद साधताना ठाकरेंनी देशातील परिस्थिती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल चढवला. ते म्हणाले की, आपल्या देशाला सध्या पंतप्रधान, गृहमंत्री व अख्ख्या मंत्रिमंडळाची गरज आहे. कारण, आत्ता जे सत्तेत बसलेत ते केवळ एका पक्षाचे मंत्री आहेत. ते देशाचे नाहीत. यावेळी ठाकरेंनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेवरूनही केंद्राला खडेबोल सुनावले.