आज राज्यात अनेक पक्षांचे दसरा मेळावे पार पडले आहेत. नवरात्रौत्सवात 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमीचा सण साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर दसऱ्याला शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. आज शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा दादर येथील शिवतीर्थ येथे पार पडत आहे.
शिवसेना उपनेते नितीन बालगुडे त्यांच्या भाषणाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळाव्याला सुरुवात झाली असून, पावसाला न जुमानता ठाकरे यांच्या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक हजर झाले आहेत. दरम्यान या मेळाव्यात महायुतीतील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. गाढवावर कितीही शाली टाका. गाढव ते गाढवच असते. असे म्हणत उद्धव ठाकेरंनी एकनाथ शिंदेंवर तुफान टोलेबाजी केली आहे.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, "जीवाला जीव देणारी माणसं हेच खरं सोनं असतं. अनेकांचं आपला पक्ष फोडण्याकडे लक्ष आहे. कारण त्यांना असं वाटलंय की काही लोकांना पळवलं आहे. त्यामुळे आताही पक्ष फोडता येईल. जे पळवलं ते पितळ होत सोन माझ्याकडेच आहे. वाघाच कातड पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्या संगळ्यांना माहिती आहे, पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघारणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहतोय. गाढवावर कितीही शाली टाका. गाढव ते गाढवच असते. अमित शाहांच्या जोड्याचा भार वाहणारे ते गाढव आहे".
"सर्वत्र चिखलं जमलंय याच कारण म्हणजे कमळाबाई... अनेकजण सांगत होते की आजचा मेळावा कसा घेणार. मी सांगत होतो की नेहमी जसा मेळावा घेतो, तसाच यंदाही मेळावा घेणार. उलट मी सांगायचो की यावेळी मोठा मेळावा होणार. तुम्ही म्हणाल की पाऊस आणि कमाळाबाईचा काय संबंध आहे. पण कळाबाईच्या कारभाऱ्याने स्वत:ची कमळं फुलवून घेतली आहेत. जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकला आहे. "