ताज्या बातम्या

'भाजप म्हणजे वॉशिंग मशीनची जाहिरात' उद्धव ठाकरेंची सडकून टीका

लोकसभा निवडणूक प्रचारासाठी उद्धव ठाकरे मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. काल (23 एप्रिल) परभणीत भर पावसात त्यांची सभा पार पडली

Published by : shweta walge

लोकसभा निवडणूक प्रचारासाठी उद्धव ठाकरे मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. काल (23 एप्रिल) परभणीत भर पावसात त्यांची सभा पार पडली. तर आज त्यांनी नांदेडमध्ये  अवकाळी पावसामुळे आणि वेळेअभावी त्यांनी सभा घेण्याऐवजी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. उद्धव ठाकरे यांनी नांदेडचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या समर्थनात पत्रकार परिषद घेतली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

देशात हुकूमशाहीविरोधी लाट आली असून केंद्र सरकार घटना, संविधान बदलतील अशी भीती निर्माण झाली आहे, असं म्हणत महाविकास आघाडीचे 48 खासदार निवडून येतील असा दावा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. तसंच अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेल्यामुळे पक्षाला नवीन संजीवनी मिळाला असं ते म्हणाले.

तर दुसरीकडे शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात असंतोष असल्याचं ते यावेळी म्हणाले. मोदी सरकारने सात बारावरील शेतकऱ्यांची नाव खोडून गद्दार सेनेच्या नाव लिहिलं. जर हे सरकार तुम्हाला नकली म्हणत असतील तर ते म्हणालाही नकली शेतकरी म्हणायला मागेपुढे पाहणार नाही, अशी शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात भीती आहे.

सुनेत्रा पवार यांनी हजारो कोटींच्या घोटाळ्या प्रकरणातून क्लिनचीट मिळाली यावर उद्धव ठाकरेंनी भाजपला वॉशिंग मशीनची जाहिरात असल्याचं म्हणाले. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार होतो, इथे सर्व सामान्य आणि महिलांची सुरक्षा ऐरणीवर असताना मोदी गद्दारांना सुरक्षेचं कवत देत फिरत आहेत. अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा