ताज्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबईतील शिवाजी पार्कवर धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ; दसरा मेळाव्यातून कुणावर साधणार निशाणा?

आज मुंबईतील शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आज मुंबईतील शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची परवानगी मिळाली आहे. उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यातून कुणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होतात. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची मेळाव्यासाठी लगबग पाहायला मिळते आहे.

या मेळाव्यासाठी राज्यभरातून लोक येत असतात. विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा दसरा मेळावा महत्वाचा आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यातून काय घोषणा केली जाते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर