Uddhav Thackeray 
ताज्या बातम्या

"शिवसेना प्रमुखांचा आणि धनुष्यबाणाचा फोटो न लावता माझ्यासमोर निवडणूक लढवून दाखवा"; उद्धव ठाकरेंचं CM शिंदेंना थेट आव्हान

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. ते शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते.

Published by : Naresh Shende

Uddhav Thackeray On CM Eknath Shinde : शिवसेना वार करेल तर समोरून करेल, यांच्यासारखा पाठून वार करणारी आमची औलाद नाही. मिंधे बोलले, आम्ही शहरी नक्षलवाद करतो. हुकूमशाही तोडा आणि लोकशाही वाचवा, हा प्रचार नक्षलवाद वाटतो तुम्हाला? लोकशाही वाचवा, देशाचं संविधान वाचवा हे नक्षलवाद असेल, तर मी आतंकवादी आहे. सत्तेचा दुरुपयोग करून विरोधीपक्ष फोडून टाकायची आणि चांगलं सरकार पाडायचं आणि स्वत:च्या पक्षात त्यांना मंत्रिपदं द्यायची. हा शहरी नक्षलवादापेक्षाही लोकशाहीची हत्या करणारा भयानक नक्षलवाद आहे. नक्षलवादी तुम्ही आहात. तुमचं कर्तृत्व लोकांनी बघितलं आहे. एव्हढं सगळं करून सुद्धा लोकांनी आम्हाला मतं दिली आहेत. जर तुम्ही शंड नसाल, तर शिवसेना प्रमुखांचा फोटो न लावता, धनुष्यबाण न लावता, माझ्यासमोर निवडणूक लढवून दाखवा. नाहीतर शंड म्हणून गावात फिरा, विजेते म्हणून फिरू नका, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. ते शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते.

शिवसैनिकांना संबोधीत करताना उद्धव ठाकरे म्हणाले, काही क्षण असे येतात की त्याक्षणी भावना व्यक्त करणं कठीण असतं. तसाच आजचा हा क्षण आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आपल्या शिवसेनेचा वर्धापन दिनानिमित्त होणारा पहिला जाहीर कार्यक्रम आहे. मी वर्ष मोजत नाही. कारण शिवसेना म्हटल्यावर नवचैतन्य आणि तरुणाई आलीच पाहिजे. त्यामुळे वर्ष कितीही होऊद्या वर्धापन दिनाच्या मी शुभेच्छा देतो. ज्या ज्या देशभक्तांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेला मतदान केलं, यामध्ये माझे मराठी, हिंदू, दलित, मुस्लीम, शिख, ख्रिश्चन सर्वच आहे, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. सर्व विजयाचा श्रेय मला दिला आहे, पण मी शून्य आहे. यशाचा मानकरी मी आहे, हे मी कधीच मानणार नाही. यशाचे धनी तुम्ही आहात.

शिवसेनाप्रमुखांनी मला दोन गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे आत्मविश्वास. आपल्यात आत्मविश्वास असेल, जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा, तुला मरण नाही. पण आत्मविश्वास आणि अहंकार यात फरक आहे. होय मी हे करु शकते, मी यांना पाडू शकतो, हा आत्मविश्वास आहे. पण मी एकटाच हे करु शकतो, हा अहंकार आहे. निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण सुरु आहे. भाजपला तर तडाखा बसलेलाच आहे. पण तडाखा बसल्यावर पुन्हा एकदा विषयांतर कसं करायचं, हे त्यांना कळलं आहे. म्हणून निवडणूक झाल्यावर सुरु झाले की, उद्धव ठाकरे पुन्हा एनडीएमध्ये जाणार. ज्यांनी आपल्या मातेसमान शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला, त्या नालायकासमोर जायचं का? तुमचं काय ते उघडं पडलंय ते तुम्ही बघा. भुजबळ शिवसेनेत जाणार, असंही म्हणाले. या नुसत्या उचापात्या करत सुटले आहेत. तुम्ही तुमचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहात.

हे सरकार चालेल, असं मला वाटत नाही. सरकार चालू नये, असच माझं मत आहे. हे सरकार पडलंच पाहिजे. निवडणुका पुन्हा झाल्याच पाहिजेत. नाही झाल्या तर आम्ही इंडिया आघाडीचं सरकार स्थापन केलं. आपल्यावर जो आरोप केला जातो, शिवसेनेला हिंदू मत मिळाली नाही. शिवसेनेला मुस्लीम मतं मिळाली आहेत. हो या समजाची मतं मिळाली आहेत. सर्व देशभक्तांची मतं शिवसेनेला मिळाली. आम्ही काँग्रेसमध्ये गेलो, म्हणून ते म्हणतात उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडलं. लोकशाही आणि देशाचं सविधान वाचवण्यासाठी सर्व देशभक्तांनी आम्हाला मतं दिली. नरेंद्र मोदी आणि भाजपने सत्तेसाठी हिंदूत्व सोडलं आहे. तुम्ही २०१४ आणि २०१९ चा एनडीएचा फोटो बघा आणि आज जे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू त्यांच्यासोबत सत्तेत बसलेत, ते काय हिंदुत्ववादी आहेत का?

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक