रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राजकारणात काहीही होऊ शकतं ते खरं आहे. जर उद्धव ठाकरे महायुतीत आले तर त्यांचं स्वागत असल्याचं विधान रामदास आठवले यांनी नवी मुंबईत केलं आहे.
दरम्यान, आज भाजपच्या मेळाव्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे रामदास आठवले यांनी केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
मनसे विषयी काय म्हणाले रामदास आठवले?
'मनसेची महायुतीला गरज नाही, त्यांच्यावर परप्रांतीय नाराज आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत घेणे परवडणारं नसल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.