घाटरकोपर येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना भैय्याजी जोशी म्हणाले होते की, "मुंबई ही कुठलीही एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा असून वेगवेगळ्या परिसरामध्ये विविध भाषा बोलल्या जातात. जसे की, मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. तसेच गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी आहेत, तिथे मराठी भाषा बोलणारे लोक आढळून येतील. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकता यायला हवं", असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी केलं आहे. यावर आता विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला आहे. याचपार्श्वभूमिवर शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपाला इंडिया नाहीतर हिंदीया करायचा आहे- उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले की, "अनाजी पंत याही काळात जन्माला आलेले आहेत. जसं काय आम्हीच सगळ्यांना ब्रह्मज्ञान शिकवलं आहे, असा भास करून काही लोक वावरत आहेत. काल भैय्याजी जोशी घाटकोपर मध्ये येऊन 'घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे' असं बरळून गेले. या लोकांनी हिंदू मुस्लिम असा वाद काढला नाही तर आता मराठी मराठी असा वाद काढलेला आहे. तुम्ही तुम्ही मराठी भाषेला अभीच्या भाषेचा दर्जा दिला म्हणजे काही उपकार केले नाहीत. मुंबईमध्ये तुम्ही साखरेचा खडा देऊ शकत नसाल तर मिठाचा खडा टाकू नका. तुम्हाला स्पर्धा करायचे असेल तर चांगल्या गोष्टींसोबत स्पर्धा करा. भाजप उत्तर विरुद्ध दक्षिण असा देश तोडायला निघालेला आहे. भाजपाला इंडिया नाहीतर हिंदीया करायचा आहे" असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंकडून भैय्याजी जोशी यांना आव्हान
उद्धव ठाकरे म्हणाले, "अशी भाषा त्यांनी अहमदाबादमध्ये जाऊन करावी कर्नाटकात, तामिळनाडूमध्ये, बंगालमध्ये आणि केरळमध्ये जाऊन करून दाखवावी त्याचसोबत दक्षिण भारतात अशी भाषा करून सुखरूप येऊन दाखवावं. मराठी माणूस हा सहहृदयशील आहे दिलगिरी आहे म्हणून कोणी ही याव आणि टपली मारून जाव अशी परिस्थिती झाली आहे. भाषावर प्रांत रचना झाले आणि मुंबईची गल्ली रचना करत आहेत का? आणि मग तोडा फोडा आणि राज्य करा अशा प्रकारची विकृत वृत्ती पुढे आलेले आहे. अशा प्रकारचे वृत्तीना सरकारने वेळीच ठोकले पाहिजे. मुख्यमंत्री काय बोलले काल कोरडकर चिल्लर माणूस आहे, तसेच भैय्याजी देखील चिल्लर माणूस असल्याच जाहीर कराव. तसेच त्याच्यावर राज द्रोहचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांनी एक तर कारवाई करावी किंवा मग असं स्पष्ट कराव की, हा संघाचा आणि भाजपचा छुपा अजेंडा आहे", असं शिवसेना बाळासाहेब पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.