आज राज्यात अनेक पक्षांचे दसरा मेळावे पार पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर दसऱ्याला शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. आज शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा दादर येथील शिवतीर्थ येथे पार पडत आहे.
शिवसेना उपनेते नितीन बालगुडे त्यांच्या भाषणाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळाव्याला सुरुवात झाली असून, पावसाला न जुमानता ठाकरे यांच्या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक हजर झाले आहेत. दरम्यान या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.
त्यांनी केलेल्या विधानानंतर आता भविष्यात लवकरच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. "अनेकांना प्रश्न पडला आहे की, मी आता पुढचा कार्यक्रम काय देणार. अनेकांना प्रश्न पडलाय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? अरे मग 5 जुलै रोजी आम्ही काय केलं होतं? मी तेव्हाच बोललेलो आहे की आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो आहोत. आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी... मराठीसाठी आम्ही एकत्र आलोय. हिंदूत्वावरुन आमच्या अंगावर येऊ नका, आमच्या अंगावर आलात तर टोप्या घातलेले फोटो लावेन, ठाकरेंनी भाजपला इशारा दिला".
"मुंबई मराठी माणसाने रक्त सांडवून मिळवलेली आहे. ही मुंबई व्यापाऱ्यांच्या खिशात जात असेल तर आम्ही हा खिसा फाडून मुंबई राखल्याशिवाय राहणार नाहीत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. तसेच तुमच्यात हिंमत असेल तर मराठीला हात लावून दाखवा. हात जागेवर ठेवणार नाही. हुकुमशाही विरोधात लोकांनी आवाज उठवला, इंदिरा गांधीचं सरकार पडलं. भाजपनं हिंदूत्वाचं ढोंग आणि देशभक्तीचं सोंग सोडावं".