Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा
ताज्या बातम्या

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

उद्धव ठाकरे निशाणा: एकनाथ शिंदेवर 'जय गुजरात' घोषणेमुळे टीका, भाजपच्या फोडा-राज्य करा धोरणावर हल्ला.

Published by : Riddhi Vanne

Raj & Uddhav Thackeray Vijayi Melava : आज मुंबईच्या वरळी भागात दोन प्रमुख नेत्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे‘मराठी विजय दिन’ निमित्ताने एकत्रितपणे उपस्थिती लावली. या संयुक्त कार्यक्रमात दोघांनीही जोरदार भाषणं करत सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं. शिंदेंच्या अलीकडील वक्तव्याचा संदर्भ घेत उद्धव म्हणाले, "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली. तोच दाढीवाला माणूस पूर्वी 'झुकेगा नहीं साला' म्हणायचा, पण आता म्हणतो 'उठेगाही नहीं साला'. काहीही झालं तरी हा माणूस उठणार नाही," अशी टीका करत त्यांनी शिंदेंवर उपरोधिक बाण सोडला. भाजपच्या कार्यपद्धतीवर बोलताना उद्धव म्हणाले की, "भाजपचं धोरण ‘फोडा आणि राज्य करा’ असं आहे. समाजांमध्ये फूट पाडून ते सत्तेचा खेळ खेळतात."

त्यांनी पुढे म्हटलं की, "भाजपाचे नेते कोणत्याही लग्नाला आले तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. जेवण करतील, भांडण लावतील आणि शक्य झालं तर नवरीलाही घेऊन जातील!" कार्यक्रमाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना प्रश्न विचारत सांगितलं, "आपण नेहमी दुसऱ्याच्या पालख्या वाहणारे राहणार का? की मायमराठीला प्रत्यक्ष पालखीत बसवणार?" असा साद घालत मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद

Thackeray Vijayi Melava : शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या युतीवर प्रश्नचिन्ह? म्हणाले "राज ठाकरे कुठेही असं म्हणाले नाही..."