दिशा सालियन प्रकरणाची पुन्हा चौकशी करा असं म्हणत दिशाचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया यांच्यावर आरोप करत या प्रकरणाची एनआयए चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका सतीश सालियन यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली.
दिशावर सामूहिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत केला. यातच आज उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत त्यांना दिशा सालियन प्रकरणावरुन विचारणा करण्यात आली. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "त्याच्याबद्दल माझ्याकडे काही माहिती नाही आहे. विषय कसाही असला तरी ज्या विषयाशी माझा संबंध नाही आणि ज्याच्याबद्दल मला काही माहिती नाही त्याबाबत मी बोलत नाही" असे उद्धव ठाकरे म्हणाले.