ताज्या बातम्या

देवेंद्र फडणवीसांना अटकेची भीती का वाटत होती? सामनाच्या अग्रलेखातून सवाल

Published by : Siddhi Naringrekar

मला अटक करण्यात येणार होती. तसा प्रयत्न सुरू होता. माझ्या सोर्सकडून मला तशी माहिती मिळाली होती. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा अग्रलेख सामनातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून धादांत खोटे बोलू लागले आहेत आणि हे काही संघ संस्कारांस शोभणारे नाही. फडणवीस हे राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते, माजी मुख्यमंत्री होते. 105 आमदारांचे नेतृत्व ते करीत होते. अशा नेत्याच्या मनात ”मला अटक केली जाईल” अशी भीती का असावी? ‘खाई त्याला खवखवे’ किंवा ‘चोराच्या मनात चांदणे’ या दोन म्हणी मराठीत अशा प्रसंगाला साजेशा आहेत. असे सामनातून म्हटले आहे.

महाराष्ट्रातले फोन टॅपिंग प्रकरण राजस्थानपेक्षा गंभीर आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारीच आमदारांना धमकावून फडणवीस यांच्या बाजूने उभे रहा असे बजावत होते व आमदारांचे फोन टॅपिंग करून त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवली गेली. देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून धादांत खोटं बोलतायत. हे संघ संस्कारांस शोभणारे नाही. देवेंद्र फडणवीस यांना आपल्याला अटक होईल, अशी भीती का वाटत होती? या सगळ्याचा संबंध फोन टॅपिंग प्रकरणाशी आहे का? असा सवाल आजच्या सामनातून करण्यात आला आहे.

राजकारणाचा हा 'गुजरात पॅटर्न' महाराष्ट्रात रुजला जाऊ नये यासाठी महाविकास आघाडी सरकारने कठोर पावले उचलली असतील तर फडणवीस यांनी ते काम पुढे न्यायला हवे होते. खोटया प्रकरणांत अडकवून राजकीय विरोधकांना अटक करणे हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत बसत नाही. त्याची सुरुवात भारतीय जनता पक्षाने केली. असे म्हणत सामनातून टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

"हे मोदी सरकार नव्हे, हे तर गजनी सरकार"; उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर डागली 'मशाल'

"कुणी भारताला थप्पड मारली, तर त्याचा जबडा तोडण्याची हिंम्मत आजच्या भारताकडे आहे", सोलापूरात योगी आदित्यनाथ कडाडले

"देशातील वाढत्या महागाईला नरेंद्र मोदीच जबाबदार", मविआच्या सभेत शरद पवारांचा महायुतीवर घणाघात

"नरेंद्र मोदींचं काम पाहून राज ठाकरेंनी..."; शिवतीर्थावर ठाकरेंची भेट घेतल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

"...तर सर्वसाधारण कार्यकर्तासुद्धा खासदार बनू शकतो"; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेश म्हस्केंचं मोठं विधान