Uddhav Thackeray 
ताज्या बातम्या

महिलांनो कालीमातेचं रुप धारण करा अन् महिषासुरासारखा हुकूमशहासूर संपवा - उद्धव ठाकरे

धाराशीवमध्ये जनतेला संबोधीत करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तोफ डागली, म्हणाले...

Published by : Team Lokshahi

आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुंकलं आहे. धाराशिवमध्ये जनतेला संबोधीत करताना ठाकरे यांनी महायुती सरकारवर तोफ डागली. जागतिक महिलादिनानिमित्ताने राजकीय नेते भाषण करत आहेत, यावर ठाकरेंनी निशाणा साधला. ते म्हणाले, मणिपूरमधील महिलांवर कुणीही बोललं नाही.महिला दिनाच्या शुभेच्छा कोणत्या तोंडानी द्यायच्या. महिलांनी आता केवळ शुभेच्छा घेऊ नयेत, महिषासूरमर्दिनी बनलं पाहिजे. आमच्या संघर्षाला महिला शक्तीचा आशीर्वाद हवा. महिलांनी कालीमातेचं रुप धारण करावं आणि महिषासुरासारखा हुकुमशहासूर संपवावा, असं म्हणत ठाकरे यांनी भाजवर हल्लाबोल केला आहे.

ठाकरे पुढे म्हणाले, निष्ठा कशाला म्हणतात हे संपूर्ण देशाला दाखवायचं आहे. हुकुमशाहीला संपवून टाका. संभाजी नगर आणि धाराशीवच्या नामांतरावरून अमित शहा यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले,भाजपला नामांतराचं माहिती नाही आणि आम्हाला संपवायला निघालेत. जेव्हा भाजपला सेनेची मते पाहिजे होती तेव्हा मातोश्रीवर आले. लोकसभेची लढाई वाघ विरुद्ध लांडगे आहे. भाजपने त्यावेळी मोदी शहांच्या प्रचारासाठी मला कशाला बोलावलं. पक्षप्रमुख माहिती नाही तर मग मला कशाला भेटायला आलात. २०१९ ला मातोश्रीवर कशाला आले होते. राहुल नार्वेकर लबाड आहेत, हुकुमशाहीचा महिषासूर संपवून टाका, लोकसभेच्या उमेदवारीसाठी नार्वेकरांनी आमच्याविरोधात निकाल दिला. भारतीय जनता पक्षाने आम्हाला दगा दिला आणि पाठीत वार केला.

न्यायदानातही भाजपची काळी मांजरं आहेत. इथे आमदार खासदार चोरले, आमची शिवसेना कशाला चोरली, संकटकाळात ज्यांनी मदत केली त्यांना संपवायला निघाले आहेत. बेहिशेबी संपत्तीचं आरोप असलेल्या कृपाशंकर यांच नाव जाहीर झालं, पण नितीन गडकरीचं नाव जाहीर झालं नाही. अमित शहांनी मला बंद खोलीत शब्द देऊन दगा दिला. भाजप गडकरी, पंकजा मुंडेंच काय करणार मला माहिती नाही. भाजप मित्रांना वापरुन फेकून देतो. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन सेनेसाठी कुटंबासारखे होते.

तुम्हाला आम्ही खरा धडा शिकवणार. २०१४ मध्ये युती तोडल्यानंतरही मी माणुसकी जपली होती. आम्ही तुम्हाला खांद्यावर घेतलं नसतं तर तुम्हाला चार खांदेही मिळाले नसते. राज्यातून सर्व उद्योगधंदे तुम्ही गुजरातला नेत आहेत. क्रिकेटचा अंतिम सामनाही गुजरातला. गुजरातला समृद्ध करा पण महाराष्ट्राला हिसकावू नका. आमचं हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम आहे, असंही ठाकरे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Trade Deal Ith America : "राष्ट्रीय हित हेच आमचं सर्वोच्च" ; अमेरिकासोबत व्यापार कराराबाबत पीयूष गोयल यांचे स्पष्टविचार

Chhatrapati Sambhajinagar : विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेले 'छोटे पंढरपूर'; वाळूजजवळील भाविकांचे श्रद्धास्थान

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...