Devendra Fadnavis 
ताज्या बातम्या

निवडणूक आयोगाला फटकारणाऱ्या उद्धव ठाकरेंना उपमुख्यमंत्री फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर, ट्वीटरवर म्हणाले, "त्यांचा पराभव स्पष्टपणे..."

मतदान संथगतीने सुरु असल्यानं उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका केली होती. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

Published by : Naresh Shende

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय. मतदान केंद्रात बसलेल्या निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींकडून खूप दिरंगाई केली जात आहे. तीन-चारवेळा नावं तपासली जात आहेत. ज्येष्ठ मतदारांना खूप त्रास झाला आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका केली होती. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका करत देवेंद्र फडणवीस ट्वीटरवर काय म्हणाले?

मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत.

निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत. माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की, मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा. 6 वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा