Uddhav Thackeray 
ताज्या बातम्या

"महाराष्ट्र मोदी-शहांना शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही", उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर डागली 'मशाल'

उद्धव ठाकरेंनी नांदेडमध्ये महायुती सरकारवर सडकून टीका केली. ठाकरे नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

Published by : Naresh Shende

महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा आम्ही करुन दाखवलं होतं. हे मी अभिमानाने सांगेल. कापसाला, सोयाबिनला भाव मिळवून दिला होता. पहिल्याच अधिवेशनात कर्जमुक्ती केली होती. जे नियमित कर्जफेड करतात, त्यांच्यासाठी ५० हजार रुपये प्रोत्साहन भत्ता द्यायला सुरुवात केली होती, पण या गद्दारांनी आमचं सरकार पाडलं. पाच वर्ष मिळाली असती, तर मी पुन्हा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली असती. आता शेतकऱ्यांच्या मनात भीती आहे. मोदी म्हणतात ही नकली शिवसेना आहे. मोदींना माहित नाही, त्यांच्या भाजप पक्ष बोगस आणि भेकड झाला आहे. त्यांनी आमची शिवसेना चोरली. पण त्या चोरांचा हिशोब मी चुकवल्याशिवाय राहणार नाही. मोदी-शहांना वाटत असेल, ही सर्व गुरं-ढोरं आहेत, त्यांना कसंही आम्ही हाकलू. तुम्ही बैल बघितला असेल, पण त्यांची शिंगे पाहिली नाहीत. आता महाराष्ट्र तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर सडकून टीका केली. ठाकरे नांदेडमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

उद्धव ठाकरे जनतेला संबोधीत करताना पुढे म्हणाले, त्यांनी विधानसभेत गद्दारी केली होती, त्यांना वाटलं की आपण खूप मोठं शोर्य केलं. नागेशला पाडला आणि जवळगावकरांना निवडून दिलं. आम्ही जवळगावकरांनाच जवळ केलं आहे. आता कुठे जाशील, तुझा सगळा सुफडा साफ होणार आहे. जे गुंडगिरी करत आहेत, त्यांच्यावर या शेतकऱ्यांनी नांगर फिरवा. गुंडगिरी पूर्णपणे नामशेष करुन टाका. हिंगोली यांची वडिलोपार्जित संपत्ती नाही. हिंगोली शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. विशेष म्हणजे ज्यांच्यासोबत आपण लढत होतो, ते काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष आपल्यासोबत आले आहेत.

निवडणूक आयोग यांचा घरगडी आहे. निवडणूक आयोग, यंत्रणा यांच्याकडे आहे. मला शेतकऱ्यांनी सांगितलं, उद्धवराव तुमच्या शिवसेनेच्या सातबाऱ्यावर यांनी गद्दारांचे नाव लिहिलं. आमच्या सातबाऱ्यावर यांनी दुसऱ्याचे नाव लिहिलं, तर आम्ही कुणाकडे जायचं? कारण यंत्रणा यांच्याकडे आहेत. पुन्हा ते निवडून येणार नाहीत. हे शिवसेना संपवण्याचं कारस्थान नाही. तुमच्या सातबाऱ्यावर यांनी दुसऱ्यांच नाव लावलं तर, तुम्ही काय करणार, तुमच्याकडे यंत्रणा नाही. तुम्ही जगा किंवा मरा, पण मला पंतप्रधान करा, अशी यांची मानसिकता आहे. दिल्लीत शेतकऱ्यांच्या वाटेत यांनी खिळे टाकले. त्यांच्यावर ड्रोनमधून अश्रूधुराचे गोळे सोडले. तुम्ही कुणाकडे दाद मागणार, तुमचे सर्व दरवाजे त्यांनी बंद केले आहेत.

माझ्या वडिलांचा मला अभिमान आहे. तुम्ही माझ्या वडिलांचा फोटो चोरलात. तुम्ही शिवसेना चोरली. पण तुम्ही मोदींच्या चेहऱ्यावर मते मागू शकत नाहीत. मोदींचं नाणं महाराष्ट्रात चालत नाही. शहांचा आणि महाराष्ट्राचा काडीचा संबंध नाही. हे महाराष्ट्रता फणा काढतात आणि मणिपूरमध्ये जाऊन शेपट्या घालतात. देशाला पदक मिळवून देणाऱ्या कुस्तीपटूंना भेटायला तुमच्याकडे वेळ नाही. तुम्ही समुद्रावर जाऊन फोटो काढता. आता आगडोंब पसरला आहे. शेतकरी पिसाळला आहे. हा आगडोंब मोदीजी तुम्हाला थांबवता येणार नाही. तुमच्या हक्काचा पैसा मोदी सरकार लुटून नेत आहे.

परिवातील लोक बेरोजगार झाले आहे, हा मोदी परिवार आहे का, किती शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या? पण मोदी २०१४ आणि २०१९ ला काय बोलले होते, ते सांगत नाही. शेतकरी कर्जामुळे बेजार झालं आहे. कर्जासाठी मंगळसुत्र गहाण ठेवावा लागत आहे. ही लढाई मी माझ्यासाठी लढत नाही, मी तुमच्यासाठी ही लढाई लढत आहे. एका गद्दाराला ५० खोके द्यायला यांच्याकडे पैसै आहेत. पण सोयाबिन, कापसाला भाव द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत. इतका पैसा आणला कुठून? शेतकऱ्यांच्या खिशातून तुम्ही अप्रत्यक्षरिक्या कर गोळा करता. नवीन कंपन्या गुजरातला जात आहेत. तुमच्या सातबाऱ्यावर या लोकांचं नाव आलेलं, चालेल का तुम्हाला, यांची मस्ती आत्ताच तुम्हाला गाडावी लागेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा