Chitra Wagh Google
ताज्या बातम्या

Chitra Wagh: "उद्धवजी खरं बोललात, माननीय फडणवीसजीच राहतील"; चित्रा वाघ ट्वीटरवर नेमकं काय म्हणाल्या?

उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वघा यांनी ट्वीटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Published by : Naresh Shende

Chitra Wagh Tweet : आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. राजकारणात एकतर देवेंद्र फडणवीस राहतील किंवा मी राहील, असं वक्तव्य उद्वव ठाकरे यांनी केलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वघा यांनी ट्वीटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाची कावीळ झालेले अनेक कावीळग्रस्त सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत आहेत, त्यातील एक उद्धटपंत तुम्ही आहात, असं म्हणत वाघ यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

चित्रा वाघ ट्वीटरवर काय म्हणाल्या?

माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाची कावीळ झालेले अनेक कावीळग्रस्त सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत आहेत, त्यातील एक उद्धटपंत तुम्ही आहात ! हिंदुत्व सोडून आणि वडिलांच्या विचारांशी प्रतारणा करून तुम्ही दोन्ही काँग्रेसच्या मांडीवर बसून सत्ता उबवली. पण, उसने कर्तृत्व फार काळ टिकले नाही. सत्तेवर असताना घरी बसलात, सत्ता गेल्यावर तर कायमचे घरी बसणे नशिबी आले.

ऊठसूठ मा. देवेंद्रजींवर गरळ ओकण्यासाठी एकाला तुम्ही कायमचे पाळलेले आहेच. त्याने पक्षाचे वाटोळे केले, तरी तुमचे डोळे उघडत नाहीत, हे दुर्दैव! त्याच्या पावलावर पाऊल टाकत तुमची 'विनाशकाले विपरीत बुद्धी' झाली आहे! उद्धटपंत, भ्रामक कल्पनेत वावरू नका, वास्तवाला सामोरे जा. तुम्ही म्हणता ते एकदम मान्य.. महाराष्ट्रातील जनताच म्हणू लागली आहे, आम्हाला मा. देवेंद्रजी पाहिजेत, बाकी सब झूठ हैं ! काँग्रेसच्या मांडीवर बसता, राखण्यासाठी 'हिरवी' मर्जी ! मराठ्यांच्या महाराष्ट्रातच, उद्धटपंतांना हिंदूंची एलर्जी!

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात