थोडक्यात
मराठवाड्यात पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त
उद्धव ठाकरे उद्यापासून मैदानात उतरणार
कसा असेल उद्धव ठाकरेंचा दौरा ?
मराठवाड्यत पावसाने हैदोस घातलाय. गेल्या चार दिवसांपासून धाराशिव, बीड, जालना, लातूर, परभणी अशा सगळ्याच जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पाण्याखाली गेलाय. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतर आता मंत्री,आमदार, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ लागलेत . गावोगावी नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे. शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उदयापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर असणार आहेत, अशी माहिती खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली .
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची ते पाहणी करणार आहेत .त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत शिवसेना नेते अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकर असतील . शिवसेना उबाठा गटानं मराठवाड्यातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे दहा हजार कोटी रुपयांचा मदतीच्या पॅकेजची मागणी केली होती . दरम्यान, बुधवारी ( 25 सप्टेंबर ) रोजी ते मराठवाड्यात नुकसानाची पाहणी करणार आहेत .
संजय राऊत यांची सरकारवर टीका
मराठवाड्यात 70 लाख एकर जमिनीवरील पिके उध्वस्त झाली आहेत .पशुधन, घरे उद्ध्वस्त झाली आहेत .36 लाख शेतकऱ्यांना फटका बसलाय . नऊ लाख कोटी रुपयांचा कर्ज असलेलं हे सरकार आहे .दहा हजार कोटी रुपयांची मदत मिळावी अशी आम्ही मागणी केली होती .पिशव्यांमधून मदत वाटायला सुरुवात झाली आहे . हा काय निर्लज्जपणा आहे ? समृद्धी महामार्गातून कंत्राटदारांकडून पैसे घ्या .मराठवाड्यातून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे . लोक मरत आहेत आणि सरकार प्रचार राजकारण करण्यात मश्गुल आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी सरकारवर केली .
कसा असेल उद्धव ठाकरेंचा दौरा ?
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्यात उद्या (25 सप्टेंबर ) येणार आहेत .त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकर असतील . त्यांच्या अंदाजीत दौऱ्याप्रमाणे सकाळी 11 वाजता ते धाराशिव जिल्ह्यात येतील .साडेबाराच्या दरम्यान बीड तसेच 1.30 वाजता जालना आणि शेवटी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात नुकसान पाहण्यासाठी ते येतील .
पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतीसाठी केंद्राकडे तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी केली आहे. किमान 10,000 कोटींची मदत तात्काळ जाहीर करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये नुकसानीचे (Heavy Rain) पैसे तात्काळ जमा करावेत. या खात्यांमधून बँकांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम वळती करून घेऊ नये, यासाठी निर्देश देण्याची मागणीही त्यांनी केली. पंचनामे आणि नियम तपासण्यामध्ये वेळ वाया घालवू नये, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.