शिवसेनेला जोरदार धक्के बसल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचा नाशिक दौरा झाला होता. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. आगामी काळात महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकत असल्याने आता त्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तातडीने तयारीला लागण्याचे ठरवले आहे. जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही सभा होणार आहे.
नाशिकमधून ठाकरे गटाला मोठमोठे धक्के बसत गेले. यामध्ये दोन आमदार, एक खासदार, काही माजी खासदार आणि शहरातील 12 माजी नगरसेवक तसेच काही पदाधिकारी शिंदे गटात गेले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये जाहीर सभा होणार असल्याची माहिती आहे. शिवसेना खासदार संजय राऊत 6 आणि 7 फेब्रुवारीला नाशिक दौऱ्यावर येणार आहेत.