कोकणातील नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत राजकीय शिमग्याचीच राज्यभर चर्चा सुरू आहे. भाजपवर शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी पैसे वाटपाचा आरोप केला आहे. तर शिंदे सेना आणि राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांमध्ये काल हाणामारी झाली. त्यावर आज उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला. दरम्यान ठाण्यापाठोपाठ आता नवी मुंबईतही शिंदे सेनाला उद्धव सेनेने खिंडार पाडले आहेत. जिल्हाध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर येत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदे सेनेला जेरीस आणण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे.
आपल्या लोकांची हेरगिरी सुरू
काल ठाण्यातून जे गद्दारांसोबत गेले होते, त्यातील अनेक जण परत आले आहेत. आज सुद्धा तिकडे गेले होते. ते परत आले आहेत. त्यांच्यात जोरदार मारामारी आणि बाचाबाची सुरू आहे. त्याला कंटाळून अनेक जण शिवसेनेत येत आहे. गद्दारांचा बुडबुडा फुटला आहे. त्यांचा मधे आता बाचा बाची सुरु झाली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटला आहे. राजभवन पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलत आहे. मागील दोन चार वर्षात पेगासेस बाबत ऐकत होता. तुम्ही लक्षात घ्या पेगासेस नाव बदलून यांनी आता संचारसाथी नाव ठेवलं आहे. त्यांनी आपल्याच लोकांवर अविश्वास दाखवायला सुरुवात केली आहे. नागरिकांची हेरगिरी करण्याचा हा प्रकार आहे. त्यांनी दहशतवाद्यांवर लक्ष ठेवायला पाहिजे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला.
सध्या जोरात हाणामारी…
सध्या जोरात हाणामारी सुरू आहे. पैशांची उद्धळपट्टी सुरू आहे. एक दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी किती कपडे नेणार तुम्ही? हेलिकॉप्टर मधून बॅगा कशा जात होत्या हे आपण पहिलं आहे, असा चिमटा त्यांनी एकनाथ शिंदे यांना काढला. निवडणूक सुरू आहे त्यांची लोकं त्यांच्यावर धाडी टाकत आहे. ज्याच्यावर धाड टाकली त्याचं काहीच नाही. पण ज्यानं ही धाड टाकली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं सुरू आहे. असा देश आपल्याला अपेक्षित नव्हता असे उद्धव ठाकरे म्हणाले. सध्या लोक संभ्रमात, घोटाळ्यातून सगळेजण आता जागे होत आहेत. नवी मुंबई, ठाण्यावर शिवसेनेचा असल झेंडा आपल्याला दिसायला हवा. भगव्यावर आता कोणतही चिन्ह नको आहे. शिवाजी महाराजांचा भगवाच आता दिसायला हवा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
नवी मुंबईत शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
काल ठाण्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि शिंदेंच्या निकटवर्तीय पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर येऊन शिवबंधन बांधले होते. आज नवी मुंबईतील बेलापूर, सानपाडा येथील शिंदे सेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला. एकप्रकारे त्यांची घर वापसी आज झाली.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेले प्रवेश
१.शिरीष पाटील, सह संपर्क प्रमुख बेलापूर विधानसभा
२.मयूर ठाकूर, उपविभाग प्रमुख
३.संदीप साळवे, उपविभाग प्रमुख
४.पंकज मढवी, उपशाखा प्रमुख
५.भाविक पाटील, युवा सेना उपशहर
६.संदीप मढवी, भाजप