बेस्ट उपक्रम हा सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. बेस्ट उपक्रमाला पूर्णपणे मुंबई महापालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागत आहे. बेस्ट उपक्रमामधील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी बेस्ट भवनमध्ये महाव्यवस्थापक भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. त्यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेवर जोरदार टीका केली.
नारायण राणे म्हणाले की, "आता बाळासाहेब नाही तर त्यांचे विचार उद्धव ठाकरे यांनी सोडले आहेत. बाळासाहेबांच्या भाषणाची कॅसेट घरी असतील तर ती त्यांनी रात्रभर ऐकावी. ते कधी लोकांपर्यंत गेले नाहीत शिवसैनिकांना प्रेम दिल केलं नाही जे साहेबांनी केलं. उद्धव ठाकरे यांचे पुढच्या निवडणुकीपर्यंत शिवसेना गटात पाचही आमदार राहणार नाहीत . शिवसेना एकनाथ शिंदे यांची सुरु आहे, तर उद्धव ठाकरेंची बंद पडलेली शिवसेना आहे. उद्धव ठाकरे यांच्यावरती प्रश्न विचारण्यासारखी त्यांची पात्रता नाहीत, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कधी भिकाऱ्यांना भीक पण दिली नाही. असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
पुढे वक्फ कायद्यावर नारायण राणे म्हणाले की, "कोर्टाचा आदेश केंद्र सरकार इम्पिलमेंट करेल. आम्ही कोणाची जमीन घेत नाही. एकतर वक्फ कायदा समजून घ्या. गरीब मुस्लिम लोकांचं संगोपन करण्यासाठी आहे. सरकारने घेतलेल्या निर्णय सर्व सामान्य मुस्लिम यांना व्हावा. सरकारने घेतलेल्या निर्णयांने मुस्लिम समाजाला बेनफिट करणारे आहे".