शिवसेनेची मुंबईतील सभा म्हणजे मुंबईत फक्त शिवसेनेचे वर्चस्व आणि हिंदूत्वावर आमचेच असल्याचा दावा केला. संजय राऊतसह उद्धव ठाकरे यांचे भाषण फक्त भाजपलाच टार्गेट केले. भाजपवर कठोर टीका करत भाजपचे हिंदूत्व हे खोटे असून शिवसेनेचे हिंदुत्व खरे आहे, हे ठासून सांगण्याचा प्रयत्न सभेतून केला. उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम एकनाथ शिंदे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सभेतील गर्दीचा उल्लेख करत मुंबईचा विकासाचा पाढा वाचला.
मुंबई महानगर पालिकेची आगामी निवडणूक समोर ठेऊनच सभेचे नियोजन केले गेल्याचे विश्लेषक सांगत आहे. यामुळे या सभेतून शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांचे भाषण मुंबई राज्यपासून तोडल्यास काय परिणाम होतील, हे सांगत भाजपला मोठा इशारा दिला. उद्धव ठाकरे यांचे संपुर्ण भाषण हिंदुत्व आणि भाजपवर टीका करणारे होते. राज्याने कोरोना काळात केलेल काम आणि मुंबई महानगर पालिकेने केलेले काम याचा पाढा ठाकरे यांनी आपल्या भाषणात वाचला.
भाजपवर कठोर टीका
जी गाढवे आमच्यासोबत होती. त्यांनी लाथ मारण्याच्या आत आम्हीच त्यांना लाथ मारील. तुमच्या १७६० पिढ्या आल्या तरी मुंबई फडणवीस वेगळे करु शकणार नाही. या मुंबई तोडण्याचा प्रयत्न जो करेल त्याचे तुकडे-तुकडे करण्याशिवाय राहणार नाही. बुलेट ट्रेन म्हणजे मुंबई तोडण्याचा प्रश्न आहे, असा आरोप यांनी उद्धव ठाकरे यांनी सभेत केले.