राज ठाकरे (Raj Thackeray)यांची औरंगाबादमधील सभा आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray )यांची मुंबईतील सभेची (Mumbai)तुलना केल्यास हिंदुत्व हा कॉमन मुद्दा आहे. दोघांनी दोन्ही सभेत हिंदुत्वावर भर दिला. परंतु राज यांनी औरंगाबादमधील सभेत उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेवर टीका केली नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी राज यांनाही घेरले. राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांचे हिंदूत्व मुन्नाभाई चित्रपटातील केमिकल लोचा असल्याचे सांगितले.
राज ठाकरे यांच्या हिंदुत्वावर उद्धव ठाकरे यांनी कठोर टीका केली. उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी संजय दत्तच्या मुन्नाभाई चित्रपटाचे उदाहरण दिले. चित्रपटात संजय दत्तला सर्वत्र गांधींजी दिसतात. पण शेवटी त्याला कळते की आपल्या डोक्यातला केमिकल लोचा होता. तसेच आपल्याकडील नवहिंदुत्वाचे झाले आहे. भगवी शाल घातली आणि कॉपी केली म्हणजे हिंदू हद्रयसम्राट होत नाही. चित्रपटाप्रमाणे समजेल ते केमिकल लोचा आहे.
औरंगबादमध्ये राज काय म्हणाले होते...
आतापर्यंत सहन केलं. मात्र आता 3 तारखेनंतर सहन करणार नाही. 'अभी नही तो कभी नही' असं म्हणत राज ठारकरेंनी आवाहन केलं की, जर मशिदीवरील भोंगे काढले नाही, तर डबल आवाजात त्यासमोर आम्ही हनुमान चालिसा वाजवू. विनंती करुन समजत नसेल तर आमच्यासमोर पर्याय नाही असंही राज ठाकरे म्हणाले.
बाबासाहेब पुरंदरेंना शरद पवारांनी उतरत्या वयात त्रास दिला. फक्त ते ब्राम्हण आहेत म्हणून. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राज्यात जातीवाद सुरु झाला. जातीबद्दल आपुलकी प्रत्येकाला होती, मात्र दुसऱ्या जातीबद्दल द्वेष राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर निर्माण झाला.
शरद पवार प्रत्येक माणसाकडे जातीमधून पाहतात. हातात पुस्तक घेतलं की लेखकाची जात पाहतात. राज ठाकरेंनी आजोबांची पुस्तक वाचली का म्हणे...माझ्या आजोबांनी लिहीलेल्या सर्व गोष्टी तुम्ही वाचा मग कळेल असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी काही संदर्भ देखील दिले आहेत. राष्ट्रवादीमुळे दुसऱ्या जातीबद्दल भेद निर्माण झाला असा घणाघात राज ठाकरेंनी केले.
शरद पवार हे कधीही कुठल्या जाहीर सभेत छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेत नव्हते. आता मी बोलल्यानंतर त्यांनी छत्रपतींचं नाव घेण्यास सुरुवात केलीय. इतकंच नाही तर शरद पवार हे नास्तिक असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला होता. आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी हा आरोप केलाय. तसंच खुद्द शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनीच लोकसभेत शरद पवार हे नास्तिक असल्याचं म्हटलं होतं,