दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशीसाठी वडील सतीश सालियन यांची हायकोर्टात याचिका दाखल केली असून दिशाचा सामुहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप करत तिच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेतली आहे. यामुळे आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोर्या हे पुन्हा अडचणीत सापडले आहेत. दरम्यान शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी दिशा सालीयान प्रकरणी आदित्य ठाकरेंवर सत्ताधाऱ्यांकडून निशाणा साधला जात असल्याचं वक्तव्य केल.
तर नितेश राणे यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरेंनी नैतिकतेने आपला राजिनामा द्यावा अशी मागणी केली. त्यानंतर निलेश राणे यांनी दिशा सालियान प्रकरणी उद्धव ठाकरेंनी दडपशाही केल्याचा धक्कादायक दावा केला आहे. असं असताना ठाकरेंकडून याप्रकरणी काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होत. अशातच आता शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मला असं वाटत आहे की, हे सरकार अपयश लपवण्यासाठी एक एक गोष्टी बाहेर काढत आहे आणि त्यात स्वतःच अपयशी होत आहे. या सरकारच्या कारभाराचे ढिंडवडे दिवसंदिवस समोर येत आहेत. वेळ मारुण न्यायची म्हणून यांचा हा कारभार चालू आहे. बाकी, मी काही दिवसांत आणखी विस्ताराने बोलेन. पण तोपर्यंत मला असं वाटत की, ही जी सगळ्यांची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न सुरु आहे. हे करण्यापेक्षा जनतेनेने दिलेले बहुमत सत्कार्मी लावा. अशी संधी सारखी सारखी नाही मिळत त्यामुळे या संधीच सोन करा चिखल करु नका, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिल आहे.
दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरेंची स्पष्ट भूमिका
तसेच पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, "मला गेले एक-दोन आठवड्यात नवल वाटत होत की, अधिवेशनात हा मुद्दा आला कसा नाही? दर वेळेला अधिवेशन आलं की, हा मुद्दा काढला जातो, त्यात नवीन काय आहे. पण शेतकरी आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांच्या ज्या चिता पेटत आहेत त्याला जबाबदार कोण आहे? त्यांच्या माता बहिणी जो टाहो फोडत आहेत, त्यांच्या मुली ज्या सांगत आहेत आमच्या वडिलांची आम्तहत्या झाली आहे हत्या झाली आहे त्यांच्याबद्दल चौकशीचं काय? देशमुखांची हत्या झाली त्यांची मुलगी सरकारला प्रश्न करत आहे की, माझ्या वडिलांच्या हत्येचं काय? दिशा सालियनचे मृत्यू प्रकरण न्यायालयात सुरु आहे. त्यामुळे काय पुरावे आहेत ते न्यायालयात द्यावेत. जे काय आहे ते कोर्टात द्या", असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
ठाकरेंकडून गायकवाडांना धन्यवाद
"संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केली यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी त्यांच धन्यवाद करतो, कारण आमच सहा ते सात पिढ्याजनतेसमोर आहेत. आमचा या प्रकरणात दुर-दुर संबंध नाही. पण, राजकारण वाईट बाजूने न्यायचं असेल तर मात्र सर्वांचीच पंचाईत होईल. कारण, जर खोट्याचा तुम्ही नायटा करणार असाल तर तुमच्यावरही हे पलटू शकते".