महाराष्ट्रातील राजकारण हे सध्या खुप मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेले दिसून येत आहे. आजच्या दिवशीची कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची पत्रकारपरिषद चांगलीच गाजली. या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर भाष्य केले आहे. त्यांनी मतदार संख्येवरुन निवडणूक आयोगावर अनेक आरोपदेखील केले आहेत. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देत दिल्लीमध्ये होणाऱ्या पराभवाची तयारी करत असल्याचा टोला लगावला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खासदार संजय राऊत हे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे. अनेकदा ते सरकार तसेच सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांवर भाष्य करताना दिसतात.
अशातच आता संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल भाष्य केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये 'लाडकी बहीण' ही योजना सरस ठरली. महायुती सरकारला या योजनेचा फायदादेखील झाला. महाराष्ट्रातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. आता ही रक्कम 2100 रुपये केली जाणार असल्याचीदेखील घोषणा करण्यात आली आहे. मात्र त्याआधीच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये पाच लाखांची घट झाली आहे. यावरुन राऊतांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "आता सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे त्यांना जितकं ओझं कमी कमी करता येईल तितके ते करतील".
संजय राऊत यांच्या व्यक्तव्यावरुन मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, "महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही.