उज्जैन- महाकालेश्वर मंदिर संकुलात भीषण आग लागली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिर संकुलात भीषण आग लागली. शंख द्वारजवळील एका कार्यालयाच्या बॅटरीच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते आहे.
आग इतकी भयानक आहे की काळ्या धुराचे लोट दूरवरून दिसत आहेत. या घटनेमुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती पोहचताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे.