ताज्या बातम्या

Russia Vs Ukraine War: युक्रेनचे रशियाला प्रत्युत्तर; थेट पाच एअरबेसवर हल्ला

युक्रेनचा प्रत्युत्तर हल्ला: रशियातील पाच एअरबेसवर ड्रोन हल्ला, 41 लष्करी विमाने निकामी.

Published by : Riddhi Vanne

युक्रेनने रशिया Russia वर आतापर्यंतची सर्वात दूरवरची आणि मोठी ड्रोन कारवाई करत, रविवारी पाच महत्त्वाच्या लष्करी एअरबेसवर हल्ला चढवला. "स्पायडर्स वेब" Operation Spiders Web या ऑपरेशनअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये 41 लष्करी विमाने निकामी करण्यात आली असल्याचा युक्रेन Ukraine चा दावा आहे

लाकडी केबिनमध्ये लपवलेले ड्रोन

युक्रेनच्या सुरक्षा यंत्रणेने (SBU) या कारवाईची दीड वर्षे नियोजन केले. ड्रोन आधीच रशियात पाठवले गेले होते आणि ट्रकवर लाकडी केबिन्सखाली लपवण्यात आले होते. हल्ल्याच्या वेळी या केबिन्सची छपरे दूरस्थपणे उघडली गेली आणि 117 ड्रोननी एअरबेस Airbaseवर लक्ष साधले.

झेलेन्स्कींचे दावा आणि रशियाची कबुली

अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी या कारवाईचे कौतुक करताना तिला "तिन्ही वर्षांतली सर्वात दूरवरची आणि प्रभावी कारवाई" असे म्हटले. त्यांनी सांगितले की, रशियाच्या क्रूझ मिसाईल वाहक क्षमतेपैकी 34 टक्के लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला. रशियाने मुरमान्स्क, इरकुत्स्क, इव्हानोव्हो, र्याझान आणि अमूर येथील एअरबेसवर हल्ले झाल्याचे मान्य केले आहे. काही विमानांना आग लागल्याचेही त्यांनी कबूल केले. मात्र जीवितहानी टळल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयाने केला आहे.

राजनैतिक घडामोडींची पार्श्वभूमी

या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचा शिष्टमंडळ सोमवारी इस्तंबूल येथे रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. ही बैठक तुर्कस्तानच्या मध्यस्थीने होणार असून, अमेरिका युद्धविरामासाठी दबाव वाढवत आहे. रशिया अद्याप आपली शांतता योजना जाहीर केलेली नाही. दरम्यान, रशियन आणि अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांमध्ये फोनवर चर्चा झाल्याचे रशियन माध्यमांनी सांगितले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?