ताज्या बातम्या

Accident First Aid : अपघातग्रस्तांना तत्काळ मदत; आता टोलनाके, पेट्रोल पंप, रेस्टॉरंट कर्मचारी देतील प्राथमिक उपचार

महामार्गावरील टोलनाके, पेट्रोल पंप, रेस्टॉरंट्स आणि देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बेसिक लाईफ सपोर्ट स्कील्स (Basic Life Support – BLS) चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Published by : Team Lokshahi

भारतात दरवर्षी हजारो लोकं रस्ते अपघातांमध्ये जीव गमावतात. या मागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे अपघातानंतर लागणारा उपचारासाठीचा वेळ. विशेषतः नवीन राष्ट्रीय महामार्ग शहरांच्या बाहेरून जात असल्याने अपघातानंतर तत्काळ वैद्यकीय मदत मिळवणं कठीण होतं. याच गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता 'असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया' ने पुढाकार घेतला आहे.

महामार्गावरील टोलनाके, पेट्रोल पंप, रेस्टॉरंट्स आणि देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बेसिक लाईफ सपोर्ट स्कील्स (Basic Life Support – BLS) चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अपघाताच्या क्षणी उपस्थित कर्मचारी प्राथमिक उपचार देऊन रुग्णाचा जीव वाचवू शकतील. याचा पहिला पायलट प्रकल्प समृद्धी महामार्गावर राबविण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी दिली.

8 ते 15 जूनदरम्यान देशभरात 'सर्जन्स विक' साजरा केला जात आहे. यानिमित्ताने आरोग्यविषयक अनेक उपक्रम राबवले जात आहेत. सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सूर्यवंशी यांनी या सर्व योजनांची माहिती दिली. त्यांच्या सोबत MGM वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोरा, छत्रपती संभाजीनगर सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सत्यजित पाथ्रीकर, सचिव डॉ. मंगेश तांदळे तसेच डॉ. नवीन कासलीवाल आणि डॉ. स्वरूप बोराडे उपस्थित होते. या आठवड्यात नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय तपासण्या, मोफत शस्त्रक्रिया आणि विविध आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

तर, 15 जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे 'सर्जन्स विक'चा समारोप मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यावेळी देशभरातील नामवंत सर्जन्स या कार्यक्रमासाठी हजर राहणार आहेत. समारोपाच्या दिवशी 'इसेन्शियल ट्रॉमा लाईफ केअर सपोर्ट' या विशेष प्रशिक्षण कोर्सचे उद्घाटन होईल. हा कोर्स ट्रॉमा सेंटरमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना अपघातग्रस्तांवर तत्काळ उपचार कसे करावे, यासाठी मार्गदर्शन करेल. तसेच सर्जन्ससाठी विशेष तयार करण्यात आलेल्या मोबाइल ॲपचेही अनावरण होणार आहे.

'सर्जन्स विक' अंतर्गत 13 जून रोजी सर्वसामान्य रुग्णांसाठी मोफत ओपीडी सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 14 जून रोजी देशभरातील सुमारे 10 हजार सर्जन्स रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपणार आहेत. हा उपक्रम केवळ वैद्यकीय सेवा देण्यापुरता मर्यादित नसून, जनजागृतीचा एक मजबूत संदेशही देणारा ठरणार आहे.

वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तात्काळ मदतीचं महत्त्व अधोरेखित

वर्ष 2000 मध्ये रस्ते अपघातांमुळे होणारा मृत्यूदर सुमारे 20 टक्के होता. मात्र, 2020 मध्ये तो वाढून 36 टक्क्यांवर पोहोचल्याचं चिंताजनक वास्तव डॉ. सूर्यवंशी यांनी मांडलं. अपघातानंतर पहिल्या काही मिनिटांत केलेले प्राथमिक उपचार रुग्णाचा जीव वाचवू शकतात. त्यामुळेच महामार्गावरील कर्मचारी प्रशिक्षणित असल्यास अनेक प्राण वाचवता येऊ शकतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?