ताज्या बातम्या

Crime News : काळाचौकी प्रकरणातील तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

मुंबईतील काळाचौकी परिसरात जिवघेणा हल्ला झालेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उपचारादरम्यान मनीषा यादवचा मृत्यू झाला आहे.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • काळाचौकी प्रकरणातील तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

  • आज सकाळीच तरुणाने केला होता हल्ला

  • उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू

मुंबईतील काळाचौकी परिसरात जिवघेणा हल्ला झालेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उपचारादरम्यान मनीषा यादवचा मृत्यू झाला आहे. सर जे जे रुग्णालयात उपचार सुरू होते. सकाळी काळाचौकीच्या दत्ताराम लाड मार्गावर मनीषावर सोनू बरईने चाकूने हल्ला केला होता. दरम्यान, या हल्ल्यानंतर आरोपी सोनू बरईने स्वत:ला देखील संपवून घेतल्याची घटना घडली होती.

नेमकं प्रकरण काय?

एका तरूणाने मुंबईच्या काळाचौकी परिसरात तरूणीवर जिवघेणा हल्ला करून स्वत:ला संपवून घेतल्याची (Mumbai Crime News) घटना समोर आली आहे. या हल्यात जखमी झालेल्या तरूणीला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आरोपीने तरुणीवर हल्ला (Mumbai Crime News) केल्यानंतर स्वत:लाही मारून घेतले आहे. नेमकं या हल्यामागील कारण काय आहे, याची चौकशी सुरू आहे.

8 ते 10 दिवसांपूर्वी दोघांचा ब्रेकअप झाला होता

नरसिंग होममध्ये तरुणीवर हा जीवघेणा हल्ला झाला आहे. हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली होती. स्थानिकांच्या मदतीने टॅक्सीने तरुणीला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान, तरुणीचा मृत्यू झला आहे. तरुणीने स्वतःचा जीव वाचवायला नर्सिंग होमचा सहारा घेतला होता. 24 वर्षीय तरुणीवर प्रेमप्रकरणातून याहल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे

आज सकाळी दोघे पुन्हा भेटले यावेळी सोनू बराई नावाच्या तरुणाने सोबत आणलेल्या चाकूने तरुणीवर हल्ला केला, स्वतःचा जीव वाचवायला तरुणीने नर्सिंग होमचा आसरा घेतला होता मात्र तिथे देखील आरोपी घुसला आणि तरुणीवर चाकूने सपासप वार केल्याची माहिती आहे. घटनास्थळ रक्ताने माखलेलं दिसून येत होतं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा