22 एप्रिल रोजी जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादांनी भारतीय पर्यटकांना धर्म विचारुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या दहशतवादी हल्ल्यात 28 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. याचपार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी थेट दहशतवादी आणि पाकिस्तानाला इशारा दिला आहे. "भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याला सडेतोड उत्तर देणार आहोत. कोणतीही ताकद भारताला संपवू शकत नाही", असंही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहेत.