थोडक्यात
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज लातूर दौऱ्यावर
राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा घेणार आढावा
किल्लारी येथे शेतकरी मेळाव्यालाही गडकरी राहणार उपस्थित
दुपारी 1 वाजता किल्लारी येथे होणार आगमन
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज लातूर दौऱ्यावर. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दुपारी 12 वाजता लातूर विमानतळावर आगमन होईल. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा आढावा घेतील. त्यानंतर हेलिकॉप्टरने किल्लारीकडे प्रयाण करतील. दुपारी 1 वाजता त्यांचे किल्लारी येथे आगमन होईल व या ठिकाणी आयोजित शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहतील.