ताज्या बातम्या

Nitin Gadkari On FASTag : हायवे प्रवास अधिक सुलभ! गडकरींची मोठी घोषणा, 3000 रुपयांमध्ये एक वर्षासाठी टोल फ्री मिळणार

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत टोल फ्रीसाठी FASTag वार्षिक पासची घोषणा त्यांनी केली आहे.

Published by : Prachi Nate

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत टोल कराबाबत मोठी घोषणा केली आहे. टोल फ्रीसाठी FASTag वार्षिक पासची घोषणा त्यांनी केली आहे. यादरम्यान हा पास हा पास सक्रिय झाल्यापासून एक वर्ष किंवा 200 ट्रिपसाठी वैध असेल. हा वार्षिक पास सक्रिय करण्यासाठी हायवे यात्रा अ‍ॅप आणि एनएचएआय किंवा एमओआरटीएच वेबसाइटवर एक वेगळी लिंक उपलब्ध करून दिली जाईल.

या लिंकच्या मदतीने वार्षिक फास्टॅग पास सक्रिय करता येईल. त्याचसोबत पुढे नितीन गडकरी या घोषणेची माहिती देत म्हणाले की, "त्रासमुक्त महामार्ग प्रवासाच्या दिशेने एक परिवर्तनीय पाऊल म्हणून, आम्ही 15 ऑगस्ट 2025 पासून लागू होणारा ₹3,000 किमतीचा FASTag-आधारित वार्षिक पास सादर करत आहोत.

सक्रियतेच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा 200 ट्रिपपर्यंत - जे आधी येईल ते - हा पास केवळ कार, जीप आणि व्हॅन सारख्या गैर-व्यावसायिक खाजगी वाहनांसाठी डिझाइन केला आहे. वार्षिक पास देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर अखंड आणि किफायतशीर प्रवास करण्यास सक्षम करेल. सक्रियकरण आणि नूतनीकरणासाठी एक समर्पित लिंक लवकरच राजमार्ग यात्रा अ‍ॅपवर तसेच NHAI आणि MoRTH च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल.

हे धोरण 60 किमीच्या आत असलेल्या टोल प्लाझांबद्दलच्या दीर्घकालीन चिंता दूर करते आणि एकाच, परवडणाऱ्या व्यवहाराद्वारे टोल पेमेंट सुलभ करते. प्रतीक्षा वेळ कमी करून, गर्दी कमी करून आणि टोल प्लाझावरील वाद कमी करून, वार्षिक पास लाखो खाजगी वाहन मालकांना जलद आणि सुरळीत प्रवास अनुभव प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवते".

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी