Raksha Bandhan : वलसाडमधील अनोखं रक्षाबंधन; बहीण सोडून गेली, पण तिच्या हाताने बांधली राखी Raksha Bandhan : वलसाडमधील अनोखं रक्षाबंधन; बहीण सोडून गेली, पण तिच्या हाताने बांधली राखी
ताज्या बातम्या

Raksha Bandhan : वलसाडमधील अनोखं रक्षाबंधन; बहीण सोडून गेली, पण तिच्या हाताने बांधली राखी

वलसाड रक्षाबंधन: रियाच्या जिवंत हाताने शिवमला राखी बांधली, मानवतेचा संदेश.

Published by : Riddhi Vanne

Unique Raksha Bandhan in Valsad : रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या प्रेमाचा उत्सव. पण यंदाच्या रक्षाबंधनात गुजरातमधील वलसाड येथे घडलेली एक घटना अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरली. गेल्या वर्षी सप्टेंबर 2024 मध्ये निधन झालेल्या रिया या लहान मुलीच्या जिवंत हाताने तिच्या भावाला राखी बांधली गेली आणि हा क्षण मानवतेचा संदेश देणारा ठरला.

रिया ही वलसाडची रहिवासी होती. तिचा ब्रेन डेड झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. रियाचे हात मुंबईतील 15 वर्षीय अनमता अहमद हिला प्रत्यारोपण करण्यात आले. अनमताने दोन वर्षांपूर्वी विजेचा धक्का लागल्यामुळे आपला हात गमावला होता. यंदा रक्षाबंधनासाठी अनमता मुंबईहून खास वलसाडला पोहोचली, केवळ रियाच्या भावाला, शिवमला, रियाच्या हाताने राखी बांधण्यासाठी. राखी बांधतानाचा तो क्षण भावूक करणारा होता. एका बाजूला बहिण गमावल्याची वेदना होती, तर दुसऱ्या बाजूला तिचा जिवंत हात पुन्हा भावाच्या मनगटावर राखी बांधत होता.

रिया व शिवमचे आईवडील अनमताला पाहून अश्रू अनावर झाले आणि त्यांनी तिला घट्ट मिठी मारली. या घटनेतून “धर्मापेक्षा मानवतेचा धर्म मोठा” हा संदेश अधोरेखित झाला. रिया चे मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे आणि कॉर्निया देखील इतर रुग्णांना प्रत्यारोपित करण्यात आले असून तिच्या अवयवदानामुळे अनेकांचे जीव वाचले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Prakash Ambedkar On Sharad Pawar : "शरद पवारांचा दावा हा ‘वरातीमागून घोडे’; मंडल यात्रेवरूनही प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल"

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची लगबग

Rakshabandhan 2025 : राखीच्या सणानंतर एकच प्रश्न; राखी कधी काढायची?

Varanasi Temple Fire News : वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; 9 जण होरपळले, 4 जणांची प्रकृती गंभीर