Donald Trump : अमेरिका भारतावरील टॅरिफ कमी करणार? ट्रम्प यांच्या सहाय्यकाचे संकेत  Donald Trump : अमेरिका भारतावरील टॅरिफ कमी करणार? ट्रम्प यांच्या सहाय्यकाचे संकेत
ताज्या बातम्या

Donald Trump : अमेरिका भारतावरील टॅरिफ कमी करणार? ट्रम्प यांच्या सहाय्यकाचे संकेत

ट्रम्प टॅरिफ: भारत-अमेरिका व्यापार करारावर सकारात्मक संकेत, स्कॉट बेसेंट यांचे विधान.

Published by : Team Lokshahi

United States Secretary Scott Bessent On Pm Modi India and Donald Trump us 50 Tariffs Updates New Markets : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण 50 टक्के आयात शुल्क लागू केल्यामुळे भारतीय वस्तू अमेरिकेत निर्यात करताना मोठा आर्थिक भार पडत आहे. या निर्णयाचा परिणाम भारतातील अनेक उद्योगांवर होऊ शकतो, तसेच हजारो रोजगार धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांदरम्यान व्यापार करार होण्याची चर्चा होती, मात्र ती ठप्प झाल्याचे सांगितले जात होते.

27 ऑगस्टपासून लागू झालेल्या टॅरिफमुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. ट्रम्प यांनी वारंवार भारतावर टीका केली असून, त्यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. तरीही, आता ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांकडून आशावादी संदेश दिला जात आहे.

अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी भारत-अमेरिका व्यापार नातेसंबंधांबाबत सकारात्मक भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, “हे एक जटिल नातं आहे. ट्रम्प आणि मोदी यांचे संबंध चांगले आहेत, पण रशियन तेल खरेदीवर मतभेद आहेत. स्वातंत्र्यदिनानंतर आयात शुल्कावर चर्चा झाली होती, मात्र अजून करार अंतिम झालेला नाही. मला अपेक्षा होती की भारत हा करार करणाऱ्या पहिल्या देशांपैकी असेल, पण त्यांनी वाटाघाटी पुढे ढकलल्या.”

बेसेंट यांनी पुढे सांगितले की, “भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि अमेरिका ही सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. मला खात्री आहे की अखेरीस दोन्ही देश एकत्र येतील आणि पुढे वाटचाल करतील.” त्यांच्या या विधानामुळे भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत पुन्हा तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

IPL News : रोहित-विराटनंतर आणखी एक धक्का! CSK मधील स्टार खेळाडूने केला IPL ला गुडबाय

PM Kisan Yojana : PM किसान योजनेचा 21 वा हप्ता कधी मिळणार; शेतकऱ्यांसाठी दिलासा की नव्या अडचणींचा इशारा?

Latest Marathi News Update live : आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन विरार कडे ट्रेन ने रवाना

Ganeshotsav 2025 : लालबागच्या राजाच्या दर्शनाला जॅकलिन फर्नांडिस आणि पार्थ पवार; एका कृतीनं वेधलं लक्ष