गेल्या दोन दिवसांआधी महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला. आताही महाराष्ट्रातील अनेक भागांत पाऊस कोसळतोय. या पावसामुळे सगळ्यात जास्त नुकसान कशाचं झालं ते तर शेतकऱ्याचं, शेतीमध्ये पिकवलेल्या भाजीपाल्याचा वावरातच चिखल झाला. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. म्हणूनच, भाज्यांचे दर इतके वाढले आहेत की, सर्वसामान्य नागरिकांचं बजेट पुरतं कोलमडून गेल आहे. भाज्यांचे दर कसे वाढलेत, वाचा याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट.
व्यापारी विजय सोनकर यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे. त्यावेळेस ते म्हणाले की, "महाराष्ट्रभर पडलेल्या पावसामुळे वावरातला भाजीपाला नासून गेला. त्यातच नवी मुंबईतही जोरदार पाऊस झाला. त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेला भाजीपालाही खराब झाला. त्यामुळे नवीन भाज्यांची आवक होईपर्यंत भाज्यांचे दर असेच चढे राहणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत."
व्यापारी संपत जाधव यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे. त्यावेळेस ते म्हणाले की, "महाराष्ट्रातील शेतकरी हे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये भाजीपाला पाठवता असतात. तिथून चांगला दर मिळेल अशी आशा त्यांना असते. मात्र आता पावसमुळे शेतातल्या शेतातच भाजीपाला सडून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांकडे शहरात पाठवण्यासाठी भाजीपालाच नाही. त्यामुळे शहरांमध्ये भाज्यांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम भाज्यांचे दर वाढले असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं बजेट कोलमडून गेलं आहे.
हेडर- पावसाने भाज्यांचे दर कडाडले
भाजी होलसेल किरकोळ
कांदापात १५ ते २० ५०
पालक १५ ते २५ ५०
मेथी १० ते १४ ३५ ते ४०
कोथिंबीर १६ ते २० ४० ते ५०
शेपू १२ ते २० ४० ते ५०
कांदा ९ ते १८ ३०
बटाटा १३ ते १९ ३० ते ३५
लसूण ५० ते १२० १०० ते २००
भेंडी २४ ते ४४ ६० ते ८०
दुधी भोपळा १६ ते २२ ६० ते ८०
फरसबी ८० ते १०० १२० ते १६०
गवार ३० ते ६० ८० ते १२०
काकडी १६ ते २८ ६०
कारली ३० ते ३६ ८०
फ्लॉवर १८ ते २८ ८० ते १२०
कोबी ६ ते १० ६०
ढोबळी मिरची ३६ ते ४६ १००
शेवगा शेंग ३० ते ५० १०० ते १२०
टोमॅटो १२ ते २४ ६०
वाटाणा ८० ते १०० १६०
वांगी २० ते ३६ ६० ते ८०
मिरची २० ते ६० ८०