Manoj Jarange Patil Azad Maidan : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आंदोलनाचा स्वर अधिक तीव्र झाला आहे. आंदोलकांना अन्न, पाण्यासाठी वणवण करावी लागत आहेत. याचपार्श्वभूमीवर गाव खेड्यातील महिला वर्गाने मोठा निर्णय घेतला आहे.
जे मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषण करत आहेत त्यांच्यासाठी गाव खेड्यातून मोठ्या प्रमाणात भाकरी पाठवण्याचं काम ग्रामीण भागातील महिला या करत आहेत. विशेष म्हणजे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा बांधवांनी आझाद मैदान सोडू नये, आम्ही जे लागल ते तुम्हाला पुरवु असं देखील ठाम विश्वास ग्रामीण भागातील भगिनींनी दिला आहे.