ताज्या बातम्या

UPI & RuPay Card Payment : आता यूपीआय आणि रुपे डेबिट कार्ड पेमेंट महागणार?

यूपीआय आणि रुपे डेबिट कार्ड पेमेंटवर व्यापारी शुल्क पुन्हा लादण्याचा सरकार विचार करत आहे, मोठ्या व्यापाऱ्यांसाठी हे पेमेंट महाग होणार का?

Published by : Prachi Nate

आजकाल यूपीआय कोड स्कॅन करुन काही सेकंदातच आपण ऑनलाइन पेमेंट करतो. परंतु व्यापाऱ्यांसाठी आता यूपीआय आणि रुपे डेबिट कार्ड पेमेंट महागणार आहे. सरकार मोठ्या व्यापाऱ्यांसाठी रुपे डेबिट कार्ड आणि यूपीआय पेमेंटवर व्यापारी शुल्क पुन्हा लादण्याचा विचार करत आहे. हे शुल्क सरकारने २०२२ मध्ये माफ केलं होतं.

पण, फिनटेक कंपन्या म्हणतात की मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये हा शुल्क भरण्याची क्षमता आहे. बँकिंग उद्योगाने या संदर्भात सरकारला एक प्रस्ताव देखील पाठवला आहे. या प्रस्तावात असं म्हटलं आहे की, लहान व्यापाऱ्यांकडून एमडीआर घेतला जाऊ नये पण ज्या दुकानदारांची वार्षिक उलाढाल ४० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांच्यावर एमडीआर म्हणजेच मर्चंट डिस्काउंट रेट लावला पाहिजे. मात्र, या प्रस्तावावर सरकारने अद्याप विचार केलेला नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?