युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) ने सिव्हिल सेवा पूर्व परीक्षा 2025 चा निकाल जाहीर केला आहे. ही परीक्षा 25 मे रोजी झाली होती. उमेदवार आता अधिकृत वेबसाइट्स upsc.gov.in आणि upsconline.nic.in यावर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात.
यंदा सुमारे 10 लाखांहून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली असून, एकूण 979 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मागील ट्रेंडनुसार, मुख्य परीक्षेसाठी साधारणपणे रिक्त पदांच्या 12 ते 14 पट उमेदवारांना पात्र ठरवले जाते. त्या अंदाजाने, यंदा सुमारे 13,000 ते 14,000 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे.
UPSC ने गेल्या काही वर्षांपासून निकाल प्रक्रियेत वेग राखलेला आहे. 2024, 2023 आणि 2022 मध्ये निकाल परीक्षा झाल्यानंतर 15 ते 17 दिवसांत जाहीर करण्यात आला होता. मात्र, 2020 आणि 2021 मध्ये कोरोनामुळे ही प्रक्रिया सुमारे 19 दिवसांनी पार पडली होती.
मुख्य परीक्षा यावर्षी येणाऱ्या काही महिन्यात पार पडणार आहे. प्रिलिम्स उत्तीर्ण उमेदवारांनी तयारी सुरू ठेवण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.