ताज्या बातम्या

UPSC Main Exam Results: UPSCच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर;असा करा चेक

आज केंद्रीय लोकसेवा आयोगानं सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

Published by : shweta walge

आज केंद्रीय लोकसेवा आयोगानं सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा यूपीएससीची (UPSC) मुख्य परीक्षा दिलेले विद्यार्थी त्यांचा निकाल अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर पाहू शकतात. यंदा १५ ते २४ सप्टेंबर या कालावधीत युपीएससीची मुख्य परीक्षा पार पडली होती.

कसा पहाल यूपीएससी मुख्य परीक्षा 2023 चा निकाल?

  • अधिकृत वेबसाईट upsc.gov.in ला भेट द्या.

  • होमपेज वर निकालाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा. किंवा वेबसाईट वर परीक्षा आणि त्याखाली निकालाच्या टॅब वर अंतिम निकाल पाहता येईल.

  • निकालावर क्लिक केल्यावर निकाल हा एका पीडीएफ फाईल मध्ये दिसेल जो डाऊनलोड देखील करता येऊ शकतो.

  • आता तुमचा रोल नंबर त्यामध्ये शोधा आणि तुम्ही पुढील फेरीसाठी पात्र झालात का? हे तपासा.

  • इथे थेट पहा तुमचा निकाल

युपीएससीनं २८ उमेदवारांचा निकाल कोर्टानं प्रलंबित प्रकरणांमुळं रोखून ठेवले होते. मात्र आता हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे अंतिम निकाल १५ दिवसांच्या आत पर्सनल इन्टरव्हूनतंर आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड केले जाणार आहेत. हे निकाल ३० दिवसांसाठी वेबसाईटवर उपलब्ध राहतील.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा