फॅशन आयकॉन उर्फी जावेदनं नऊ वर्षांनंतर तिचे लिप फिलर केले असून तिच्या बदललेल्या चेहऱ्यावर केल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक कमेंट्स आले आहेत. आता ती तिच्या सुजलेल्या चेहऱ्याची खिल्ली उडवणाऱ्या ट्रोलर्सना प्रत्युत्तर देत आहे. इन्स्टाग्रामवर, उर्फीने तिचे पोस्ट-फिलर लूक दाखवणारे नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामुळे तिच्या अलीकडील लूकबद्दल मीम्स बनवणाऱ्या टीकाकारांना संदेश मिळाला आहे.
तिच्या पोस्टमध्ये उर्फीने लिहिले आहे की, "सर्व ट्रोलिंग आणि मीम्स, खरं सांगायचं तर मला खूप हसू आलं! बघा, हा माझा चेहरा आता फिलर किंवा सूजशिवाय आहे. माझा चेहरा किंवा ओठ असे पाहण्याची सवय नाही. मी इथे लिप प्लंपर वापरला आहे." फोटोंमध्ये उर्फीनं निळ्या रंगाचा चेकर्ड ड्रेस परिधान केलेला दिसत आहे, ती आत्मविश्वासाने तिचा नैसर्गिक लूक दाखवत आहे.
सोशल मीडिया पोस्टला रिअॅलिटी शोमधील इतर स्पर्धक अंशुला कपूरनं पाठिंबा दिला, तिने कमेंट केली, "सुंदर!" अनेक चाहत्यांनी उर्फीचे कौतुकही केले, एका युजरनं लिहिले की, "कृपया कायम असेच राहा... कोणत्याही फिलरपेक्षा किंवा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा सुंदर."
उर्फी, जिला नुकतेच निकिता लूथरसोबत द ट्रेटर्सच्या पहिल्या सीझनची सह-विजेती म्हणून गौरवण्यात आले आहे, ती तिच्या ओठांच्या आकारात बदल करण्याची प्रक्रिया उघडपणे शेअर करत आहे. तिच्या या परिवर्तनादरम्यान, तिने तिचा विनोदी भाव कायम ठेवला, अगदी विनोदाने म्हटले, "माझ्या बॉयफ्रेंडने मला सांगितले की, 'मैं बात बात पे मुह फुला लेती हू. खरे आहे ना?"
हेही वाचा