अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (15 नोव्हेंबर) कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या काही महिन्यांत ट्रम्प प्रशासनाने भारतासह अनेक देशांवर टॅरिफ लादले होते. या निर्णयामुळे जागतिक व्यापार संबंध बिघडले होते आणि त्याचा फटका अमेरिकेलाही बसला होता. आता टॅरिफ कमी करण्याच्या निर्णयामुळे अनेक देशांना दिलासा मिळणार असून भारतालाही याचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेती उत्पादनांवरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय
ट्रम्प यांनी कृषी क्षेत्राशी संबंधित जवळपास 100 हून अधिक वस्तूंवरील टॅरिफ कमी करण्यास मान्यता दिली आहे. या आदेशावर सहीदेखील झाली असून तो 13 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. बीफ, टोमॅटो, कॉफी, केळी यांसारख्या शेतीशी संबंधित महत्त्वाच्या वस्तूंवरील आयातशुल्कात दहा ते पन्नास टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सर्वाधिक फायदा मेक्सिको आणि स्वित्झर्लंड या देशांना होणार आहे. उदाहरणादाखल, स्वित्झर्लंडवरील आयातशुल्क 39 टक्क्यांवरून थेट 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. मेक्सिकोमधून येणाऱ्या कृषी उत्पादनांवरही मोठा दिलासा देण्यात आला आहे, जरी काही वस्तूंवरील पूर्ण सूट मिळालेली नाही.
भारतावरील टॅरिफ अद्याप कायम; पण दिलासा मिळण्याची शक्यता
भारतावरील टॅरिफ सध्या कायम आहे. मात्र, अमेरिकन प्रशासन भारतावरील आयातशुल्कातही शिथिलता देऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कृषी, वस्त्रोद्योग आणि मसाला उत्पादनांसारख्या क्षेत्रांना याचा थेट फायदा होऊ शकतो. गेल्या काही महिन्यांत ट्रम्प यांचा कडक टॅरिफ धोरणामुळे भारताच्या निर्यातीवर परिणाम झाला होता. आता निर्णयात बदल झाल्यास व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
टॅरिफ मागे घेण्यामागचे कारण काय?
कडक टॅरिफ धोरणाचा फटका फक्त इतर देशांनाच नव्हे तर अमेरिकेलाही बसला. काही महत्त्वाच्या वस्तूंची टंचाई निर्माण झाली, तर काही उत्पादनांच्या किंमतींमध्ये वाढ झाली. वाढती महागाई हा अमेरिकन जनतेच्या नाराजीचा मोठा मुद्दा बनला. याचाच परिणाम न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत दिसला, जिथे ट्रम्प यांनी समर्थन दिलेला उमेदवार पराभूत झाला.राजकीय दडपण वाढू लागल्यानंतर अखेर ट्रम्प प्रशासनाने टॅरिफ कमी करत व्यापारातील तणाव कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील काही दिवसांत आणखी सवलती?
अन्य देशांवरील बंधने शिथिल करताना भारतावरील टॅरिफ कधी आणि किती प्रमाणात कमी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारत-अमेरिका व्यापाराचे प्रमाण मोठे असल्याने टॅरिफ कपातीचा फायदा दोन्ही देशांनाही होणार आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जागतिक व्यापार वातावरणाला दिलासा