अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत - पाकिस्तानमधील शस्त्रसंधीच्या मध्यस्थीच्या दाव्यावरून अनेक वेळा आपली भूमिका बदलताना दिसले आहेत. त्यांनी सुरुवातीला म्टलं होत की, भारत-पाकिस्तानमधील तणाव हा माझ्यामुळे कमी झाला आहे. मी दोन्ही देशात मध्यस्थी केली. त्यांनी स्वतः ट्वीट करत अशी माहिती दिली होती. त्यानंतर कतारमधील अल-उदेद हवाई तळावर सैन्याच्या भेटीदरम्यान एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी मध्यस्थीच्या दाव्यावरुन यू टर्न घेतला. त्यांनी सांगितले की, मी दोन्ही देशात कोणतीही मध्यस्थी केली नाही.
मात्र आता पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध रोखण्यात मोठी भूमिका बजावली आहे. ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा दावा केला की, "भारत-पाकिस्तान युद्ध थांबवणे हे त्यांच्या सर्वात मोठ्या यशांपैकी एक आहे. मात्र तरी देखील त्यांना श्रेय मिळालं नाही". तसेच पुढे ट्रम्प म्हणाले की, "त्यांनी युद्ध थांबवण्याच्या बदल्यात त्यांच्याशी व्यापार करण्याचा प्रस्ताव दोन्ही देशांना दिला होता. आता मी हिशेब चुकता करण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी व्यवसाय वापरत आहे".
तसेच पुढे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार होणार आहे. भारतात व्यवसाय करणे जवळजवळ अशक्य आहे, परंतु भारत अमेरिकन वस्तूंवरील कर 100 टक्के कमी करण्यास तयार आहे. अस म्हणत ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत जगातील सर्वाधिक कर असलेल्या देशांपैकी एक असल्याच म्हटलं आहे.