ताज्या बातम्या

Mother's Day : तुमच्या आईला द्या 'या' खास भेटवस्तू; आईच्या चेहऱ्यावर उमटेल आनंदाचे हसू

'आई' हे म्हणजे ममतेचा महासागर, निःस्वार्थ प्रेमाचं मूर्त स्वरूप.

Published by : Team Lokshahi

'आई' हे म्हणजे ममतेचा महासागर, निःस्वार्थ प्रेमाचं मूर्त स्वरूप. आपल्या आयुष्यातील पहिलं मार्गदर्शन, पहिलं रक्षण आणि पहिलं प्रेम ही 'आई'च असते. तिच्या मायेचे ऋण आपम कधीच फेडू शकत नाही. परंतू आपल्या छोट्याशा प्रयत्नातून आपण तिला आनंदी नक्कीच करू शकतो. यावर्षी ११ मे रोजी येणाऱ्या मदर्स डेच्या निमित्ताने, तिच्यासाठी खास भेटवस्तू निवडून तिचा हा दिवस अविस्मरणीय बनवा.

स्वतःची काळजी घेण्यासाठी खास भेटवस्तू

तुमच्या आईने आयुष्यभर तुमची काळजी घेतली, आता तिची वेळ आहे! स्किन केअर किट, आयुर्वेदिक मसाज ऑईल, फेस रोलर किंवा फेशियल क्लींजिंग ब्रश यांसारख्या सेल्फ-केअर वस्तू तिला देऊन तिच्या आरोग्य आणि सौंदर्याची काळजी घ्या. पार्लरमध्ये फेशियल किंवा मसाज सेशन बुक करून तिचा दिवस अधिक सुखद बनवा.

प्रेमाचा खास स्पर्श

तुमच्या भावना व्यक्त करणाऱ्या वैयक्तिकृत भेटवस्तूंना तोड नाही. फोटो प्रिंटेड कुशन, तिच्या आणि तुमच्या आठवणी जपणाऱ्या वॉल फ्रेम्स, स्केचेस, नेम खास तिला समर्पित केलेले मग किंवा डेस्क गिफ्ट्स हे सगळं तिच्या मनाचा ठाव घेतील. काम करणाऱ्या मातांसाठी ऑफिस डेस्कवर शोभून दिसणाऱ्या वस्तूही उत्तम पर्याय ठरतील.

दागिन्यांमधून जपा सौंदर्य

दागिने प्रत्येक महिलेला प्रिय असतात. सोनं, चांदी किंवा आकर्षक कृत्रिम दागिने तुम्ही तिच्या आवडीनुसार निवड करू शकता. ब्रेसलेट, गळ्यातील साखळी, अंगठी, कानातले किंवा मनमोहक नेकलेसने तिला स्वतःचं सौंदर्य पुन्हा जाणवेल.

स्टायलिश बॅग्ज

तुमची आई जर आधुनिक फॅशनची चाहती असेल तर तिला तिच्या गरजेनुसार स्टायलिश हँडबॅग, स्लिंग बॅग किंवा ऑफिस टोट बॅग भेट देऊ शकता. बाजारात आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर याचे शेकडो पर्याय उपलब्ध आहेत.

आरोग्य तपासणी

वाढत्या वयात आरोग्याकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक आहे. पण तुम्ही या मदर्स डेला तिच्यासाठी संपूर्ण आरोग्य तपासणी पॅकेज गिफ्ट करू शकता. व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, हॉर्मोन चाचण्या आणि इतर चाचण्या वेळेवर करून तिचं आरोग्य जपणं ही खरी भेट ठरेल.

मदर्स डे म्हणजे फक्त एक दिवस नव्हे, तर ‘आई’ म्हणून तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे. या खास दिवशी केवळ भेटवस्तू नव्हे, तर प्रेम, आदर आणि वेळ द्या कारण तिच्यासाठी तेच खरे अमूल्य.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Adani Group : अदानी समूहाच्या कंपन्यांना सेबीकडून क्लीन चिट

Rohit Pawar : "कोर्टाची नोटीस मिळाल्यानंतर पाऊल उचलणार", कोकाटेंनी दिलेल्या मानहानीच्या नोटीसवर रोहित पवारांचं वक्तव्य

Gold Silver Rate : ग्राहकांची चिंता मिटली! लवकरच सोने-चांदीच्या भावात होणार मोठी घसरण; कधी ते जाणून घ्या

Chhagan Bhujbal : "अंतरवालीतील दगडफेक शरद पवारांच्या..." अंतरवालीतील दगडफेकीवर भुजबळांनी केला पडदाफाश