पुण्यातील पिंपरी येथील वैष्णवी हगवणे नावाच्या विवाहित माहिलेचा मृत्यू झाला. 16 मे 2025 रोजी तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. मात्र तिने आत्महत्या केली नसून तिचा खून करण्यात आला होता, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता. पती, सासू-सासरे तसेच नणंदेकडून तिचा छळ केला जायचा, असा आरोप करण्यात आला होता. विशेष म्हणजे वैष्णवी आणि तिचा नवरा शशांक या दोघांचा प्रेमविवाह होता. घरच्यांच्या विरुद्ध जाऊन वैष्णवीने शंशाकसोबत लग्न केले होते. मात्र शंशाक तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता.
वैष्णवीच्या घराच्यांनी तिच्या लग्नात हुंडा म्हणून 51 तोळे सोनं दिले होते. त्यासोबतच महागडी फॉर्च्यूनर कार सुद्धा येण्याची आली होती. याबरोबरच महागडी भांडी, लग्नानंतर वैष्णवी माहेरी जायची, त्यावेळेस तिला चांदीची मूर्ती, दीड लाखांचा मोबाईल अशा अनेक गोष्टी माहेरच्यांनी तिला दिल्या होत्या. तरीदेखील सासरची मंडळी तिचा छळ करत होते असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी शंशाक, वैष्णवीची नणंद आणि सासूला अटक करण्यात आली होती. दरम्यान सासरा आणि दिर फरार होता. फरार आरोपी सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे आणि तिचा दिर सुशील राजेंद्र हगवणे या दोघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक करण्यात आहे. या दरम्यान गेल्या सात दिवसांपासून हे दोघे बापबेटे फरार होते.
याप्रकरणी राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. अनेकांनी पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला. आता अभिनेता, गायक, 'बिग बॉस मराठी' फेम डॉ. उत्कर्ष शिंदे यांने आपला संताप व्यक्त केला आहे. नुकतेच त्याने हुंड्यापायी बळी जाणाऱ्या मुलीची व्यथा मांडली आहे. 'हुंडाबळी' हे गाण्याचे नाव असून महिलांची व्यथा सांगणारे हे गाण रिलीज झाले आहे. उत्कर्षच्या या गाण्याने अनेकांचे कान सुन्न पडले आहे. नेटकरी या गाण्याला चांगलाच प्रतिसाद देत असल्याचे दिसून आले आहे. नेटकरी हळहळ व्यक्त करत आहेत.