UP Factory Blast Team Lokshahi
ताज्या बातम्या

UP Factory Blast : उत्तर प्रदेशातील हापूरमध्ये केमिकल फॅक्टरीत दुर्घटना

उत्तर प्रदेशातील केमिकल फॅक्टेरीमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे.

Published by : shamal ghanekar

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) केमिकल फॅक्टरीमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. हापूर बॉयलरचा स्फोट झाला आहे. यामध्ये 12 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. हापूरच्या (Hapur) धौलाना (Dhaulana) पोलीस स्टेशनच्या UPSIDC ची ही घटना आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर मदतकार्य सुरू आहे.

या अपघातमध्ये 12 मृतदेह आढळले आहेत. या कारखान्यात आणखी कामगार अडकले असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. हा स्फोट इतका भीषण हातो की त्याचा आवाज दूरपर्यंत गेला, असे आजूबाजूच्या लोकांनी सांगितले आहे.

आयजी प्रवीण कुमार यांनी सांगितले की, ही एक औद्योगिक युनिटमध्ये उपकरण कारखाना आहे जे इलेक्ट्रॉनिक उपकरण बनवते. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्यावर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या अपघातामध्ये 12 जणांचा मृत्यू तर 19 जण गंभीर आहेत. त्याच्यावर रूग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती हापूरचे डीएम मेधा रूपम यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशातील हापूर येथील रासायनिक कारखान्यातील दुर्घटना खूप भीषण असून ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. यामध्ये ज्यांनी आपला जीव गमावला आहे त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमींवर उपचार आणि सर्वतोपरी मदत करण्यात राज्य सरकार सक्रिय आहे, असे मोदींनी म्हंटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी