Utter Pradesh Team Lokshahi
ताज्या बातम्या

हिंदू देवतांचे फोटो असणाऱ्या जुन्या रद्दीपेपरमधून चिकनची विक्री

हिंदू देवतांची चित्रे असलेल्या जुन्या रद्दी वर्तमानपत्रात गुंडाळलेले मांस विकल्याप्रकरणी तालिब हुसेनला ताब्यात घेतले.

Published by : Team Lokshahi

उत्तरप्रदेशच्या संभल भागातील चमन सरायच्या बाजारात कोपऱ्यावर असलेल्या ‘महक’हॉटेलमध्ये मोठमोठी भांडी रिकामी पडलेली होती. दुपार झाली होती आणि तासाभरातच हॉटेलमध्ये जेवणासाठी ग्राहकांची गर्दी होणार होती. मात्र ३१ वर्षाच्या मोहम्मद तबिशला जेवणासाठी आज ग्राहक येतील की नाही याची चिंता भेडसवत होती. दोन दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांना तालिब हुसेनला हॉटेलच्या काऊंटरवरून पोलिसांनी उचलून नेले होते. तबिशच्या म्हणण्यानुसार, रविवारी रात्री ९ वाजता पोलिसांचे एक पथक हॉटेलमध्ये घुसले आणि हिंदू देवतांची चित्रे असलेल्या जुन्या रद्दी वर्तमानपत्रात गुंडाळलेले मांस विकल्याप्रकरणी तालिब हुसेनला ताब्यात घेतले.

काही हिंदुत्ववादी संघटनांचा हा आरोप आहे की, तालिब हुसेन मुद्दामच हिंदू देवतांची चित्रे असलेल्या जुन्या रद्दी वर्तमानपत्रात गुंडाळलेले मांस विकायचा. मात्र हा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचा दावा तालिबच्या कुटुंबाने केला आहे. ते म्हणतात की, जुन्या पेपरमध्ये आम्ही रोटी बांधून देत असतो, मांस नाही…पोलीस आणि काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते मुद्दाम या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत.

वृत्तानुसार, यानंतर दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये पोलिसांनी दावा केला आहे, की हुसैनने त्याला पकडण्यासाठी आलेल्या टीमवर चाकूने हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा आरोप खोटा असल्याचे त्याचे कुटुंबीय आणि वकिलांचे म्हणणे आहे.

तालिबच्या अटकेनंतर बोलताना मंडळ अधिकारी जितेंद्र कुमार यांनी धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपांचा उल्लेख केला पण ‘हत्येचा प्रयत्न’ केल्याच्या आरोपावर ते काहीही बोलले नाही. रविवारी रात्री उशिरा या प्रकरणी, तालिबवर भारतीय दंड संहिता कलम १५३ अ (शत्रुत्वाला चालना देणे), २९५ अ (कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने पूजास्थळाचे नुकसान करणे अपवित्र करणे), ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू जागरण मंचचे जिल्हा प्रमुख कैलाश गुप्ता यांनी हुसैनने वृत्तपत्रात गुंडाळलेले चिकन विकल्याची तक्रार दाखल केली होती.

हुसैन यांच्या मुलाने सांगितले की, जुन्या वृत्तपत्रांमध्ये गोष्टी गुंडाळणे ही एक सामान्य प्रथा असल्याने काय चूक झाली याची त्यांना कल्पना नाही. तो म्हणाला, ‘पोलिसांनी परवा माझ्या वडिलांना उचलले आणि काल (सोमवार) त्यांना तुरुंगात पाठवले. त्यांचा गुन्हा काय आहे हे आम्हाला माहीत नाही. आम्ही गेल्या २० वर्षांपासून एक दुकान चालवत आहोत, आम्ही बाजारातून वर्तमानपत्र खरेदी करतो आणि त्यात सामान पॅक करून विकतो.

हुसेनचे वकील पाशा म्हणाले की, त्यांच्या अशिलाला गोवले जात आहे. ते म्हणाले, “ हे हॉटेल भरवस्तीत आहे. तिथे कायम लोकांची वर्दळ असले आणि ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. एक म्हातारा माणूस हातात चाकू घेऊन कसा काय पोलिसांवर हल्ला करू शकेल? हे आरोप निराधार आहेत. त्याच्यावर वेगवेगळ्या कलमांखाली आरोप ठेऊन त्यांना गोवण्यात येत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा