ताज्या बातम्या

पुष्कर सिंह धामी यांचा चंपावत पोटनिवडणुकीत 55,025 मतांनी विजय

काँग्रेसला मोठा धक्का.

Published by : Sudhir Kakde

उत्तराखंडमधील चंपावत विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या विजयाने भाजपला दिलासा मिळाला आहे. तर काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली. धामी यांनी 55 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवून नवा विक्रम केला आहे. धामी यांच्याशिवाय सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं असून, काँग्रेसच्या निर्मला गहतोडीही त्यांच्यात सामील झाल्या आहेत.

गहतोडी यांना केवळ 3233 मतं मिळाली. त्यांच्या विरोधात धामी यांनी 58258मतं मिळवून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. चंपावत जागेवर काँग्रेसला डिपॉझिट गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. सपा उमेदवार मनोज कुमार आणि अपक्ष उमेदवार हिमांशू गारकोटी हे देखील शर्यतीत होते, मात्र त्यांना 1000 चा आकडा पार करता आला नाही.

चंपावत यांच्या विजयाने पुष्कर सिंग धामी यांची जागाही वाचली आहे. मात्र धामी यांची निवडणूक रद्द होऊ शकते, असा दावा घटनातज्ज्ञांनी केला आहे. नियमानुसार, एकाच उमेदवाराला एकूण मतांपैकी 90 टक्क्यांहून अधिक मतं मिळाल्यास मतदान प्रक्रिया संशयास्पद मानली जाते. धामी यांना एकूण मतांपैकी 92.94 टक्के मतं मिळाली होती.

काँग्रेस पुन्हा राजकारणाला बळी पडली

राज्यसभा निवडणुकीत गडबड होण्याच्या भीतीनं काँग्रेसला पुन्हा एकदा हरयाणात आमदारांना हॉटेलात ठेवावं लागलं. राजस्थानमध्ये भाजप मोठ्या संख्येनं आमदारांची पळवापळवी करेल, अशी भीती काँग्रेसला असल्यानं भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली हरियाणातील आमदारांना छत्तीसगडमध्ये पाठवण्यात आलं आहे. राजस्थानमध्येही काँग्रेसचे आमदार फुटू नयेत म्हणून काँग्रेसच्या सर्व आमदारांना उदयपूरच्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं आहे. राजस्थानमधील चार जागांसाठी काँग्रेसनं 3 तर भाजपने 1 उमेदवार उभा केला. शेवटच्या क्षणी जेव्हा उद्योगपती आणि मीडिया हाऊसचे मालक सुभाष चंद्रा यांनी भाजपच्या पाठिंब्यानं उमेदवारी उमेदवारी अर्ज भरला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर