ताज्या बातम्या

दिवाळीत उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना; बोगद्याचा भाग कोसळल्याने 30 हून अधिक कामगार अडकले

उत्तराखंडमध्ये दिवाळीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तरकाशी येथे बोगद्याचा काही भाग कोसळला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

देहरादून : उत्तराखंडमध्ये दिवाळीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तरकाशी येथे बोगद्याचा काही भाग कोसळला आहे. यात 30 ते 35 मजूर अडकल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य युध्दपातळीवर सुरु आहे.

माहितीनुसार, उत्तरकाशीच्या सिल्कयार पोळ गावात बरकोटमध्ये नव्याने बोगदा बांधण्यात येत असतो. सकाळी काम करत असताना बोगद्याचा काही भाग कोसळू लागला. त्यात काम करणारे 30 ते 35 मजूर आणि इतर कर्मचारी आत अडकले होते. सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन टीम SDRF आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन टीम NDRF देखील घटनास्थळी पोहोचली आहे.

बोगद्याच्या आत काम करणाऱ्या मजुरांची संख्या रात्रीच्या वेळी नोंदवल्यानुसार सुमारे 174 असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, ही संख्या यापेक्षा जास्त असू शकते. ही घटना पहाटे साडेपाच वाजता घडल्याचे बोलले जात आहे, मात्र उशिरा माहिती मिळाली. सध्या बोगद्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची आणि मजुरांची संख्या 30 ते 35 असू शकते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी

11th Addmission Date Extend : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ; आता 'या' तारेखपर्यंत घेता येणार प्रवेश