AI चा वापर करुन करा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचं स्मार्ट प्लॅनिंग, जाणून घ्या काय आहे ते?
ताज्या बातम्या

AI चा वापर करुन करा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचं स्मार्ट प्लॅनिंग, कसं ते जाणून घ्या...

स्मार्ट AI सहायक: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा परफेक्ट ट्रिप प्लॅनिंग

Published by : Team Lokshahi

मे महिना सुरू झाला की, शाळांच्या सुट्ट्या लागतात आणि घराघरात पर्यटनाची तयारी सुरू होते. कुणाला थंड हवेच्या ठिकाणी जायचं असतं, तर कुणाला समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवायचा असतो. मात्र प्रवासाचे नियोजन संपुर्ण करावे लागते. जसं की तिकीट काढणं, राहण्याची व्यवस्था, बजेट ठरवणं हे सर्व वैतागाचे काम वाटते. पण आता हे सगळे करायला तुमच्यासाठी एक स्मार्ट सहायक तयार आहे. ते म्हणजेच 'AI ट्रॅव्हल प्लॅनर'.

ChatGPT, Microsoft Copilot यांसारखी AI साधनं आता केवळ माहिती देणाऱ्या चॅटबॉट्सपूरती मर्यादित राहिलेली नाहीत. ही टूल्स तुमचं वैयक्तिक प्रवास मार्गदर्शक बनू शकतात. तुम्ही कुठे जायचंय, किती दिवसांसाठी आणि किती खर्चात याच्या आधारावर AI तुम्हाला योग्य प्रवास आराखडा, पॅकिंग लिस्ट आणि स्वस्त पर्याय सुचवतो.

AI तुमचं संपूर्ण प्रवास नियोजन सुलभ करतो. हवामानानुसार कोणत्या साहित्य घ्यायचे, कोणत्या वस्तू गरजेच्या आहेत. यासह ट्रेन किंवा फ्लाइटचे तिकीट कुठे स्वस्तात मिळतील, याची माहितीही AI देतो. तुम्ही फक्त तुमच्या गरजा सांगायच्या आणि AI तयार करेल एक व्यवस्थित योजना. प्रवास सुरू असताना ट्रेनचं लाईव्ह लोकेशन, फ्लाइट डिले झाली की नाही, PNR स्टेटस – हे सगळं AI तुम्हाला काही सेकंदांत सांगू शकतो. जर तुमचा प्रवास बिघडण्याची शक्यता असेल, तर पर्यायी मार्गही सुचवतो. त्यामुळे वेळ वाचतो आणि त्रास कमी होतो. लहान मुलांसाठी लागणाऱ्या वस्तू, औषधांची यादी, गर्दीपासून बचावाचे उपाय अशा अनेक छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींसाठीही AI मदत करतो. त्यामुळे तुमचा प्रवास अधिक आरामदायक आणि स्मरणीय होतो.

AI च्या मदतीने प्रवासाचं नियोजन आता झपाट्याने आणि सोपं झालं आहे. टिकिट बुकिंग, पॅकिंग लिस्ट, बजेट नियोजन सगळं एका क्लिकवर मिळते. प्रवासात लागणारी माहितीही रिअल टाइममध्ये सहज उपलब्ध होते.लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांसाठी उपयोगी सल्ले मिळतात. स्वतः वेळ घालवून शोधाशोध करण्याची गरजच उरत नाही. थोडक्यात काय तर AI हे आता केवळ तांत्रिक साधन राहिलेलं नाही, तर तुमचं ट्रॅव्हल बडी बनलं आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या खास आणि त्रासविना घालवायच्या असतील, तर AI चा वापर करून करा स्मार्ट आणि परफेक्ट ट्रिपचं नियोजन.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

EVM : आता ईव्हीएम मशीनवर दिसणार रंगीत छायाचित्र; केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Chamoli Nandanagar cloudburst : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात ढगफुटी; 5 जण बेपत्ता

Disha Patani : अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर