सोशल मीडियावर ओळख मिळवलेली आणि बिग बॉस ओटीटीमधून चर्चेत आलेली चंद्रिका दीक्षित पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. तिने नुकताच शेअर केलेल्या एका भावनिक व्हिडीओमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
या व्हिडीओमध्ये चंद्रिका व्यथित अवस्थेत दिसते. ती आपल्या संसारातील त्रास सांगताना पतीवर विश्वासघाताचे आरोप करते. घर, काम, मुलाची जबाबदारी सगळं एकटीने सांभाळत असताना आपल्याशी अन्याय होत असल्याचा दावा तिने केला आहे. यासोबतच तिने काही खासगी चॅट्स आणि एका महिलेचा फोटोही पोस्ट केला असून, “सगळे पुरावे माझ्याकडे आहेत” असं तिने म्हटलं आहे.
हा व्हिडीओ व्हायरल होताच काही जणांनी तिला पाठिंबा दिला, तर अनेकांनी यावर संशय व्यक्त केला. काही युजर्सनी हा प्रकार प्रसिद्धीसाठी केला असल्याची टीका करत तिला ट्रोल केलं.दरम्यान, या आरोपांवर चंद्रिकाच्या पतीकडून अजूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. हा वैयक्तिक वाद आहे की सोशल मीडियासाठीचं नवं नाट्य, याबाबत आता जोरदार चर्चा सुरू आहे.
थोडक्यात
चंद्रिका दीक्षित – सोशल मीडियावर ओळख मिळवलेली आणि बिग बॉस ओटीटीमधून चर्चेत आलेली.
पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली.
नुकताच शेअर केलेल्या एका भावनिक व्हिडीओमुळे.
मोठी खळबळ उडाली आहे