अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युवक-विद्यार्थी आघाडीचे अकोला महानगरप्रमुख वैभव घुगे यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यादरम्यान, जुन्या आरटीओ रोडजवळील रेल्वे ट्रॅकवर धावत्या ट्रेनसमोर उडी मारून त्यांनी जीवनयात्रा संपवली.
वैभव घुगे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांचे अगदी जवळचे सहकारी म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे त्यांच्या या अचानक मृत्यूने राजकारणापासून कार्यकर्त्यांपर्यंत शोककळा पसरली आहे. गावोगावी आणि शहरातही या घटनेची चर्चाच सुरू आहे. शहराचा महानगर असलेल्या वैभव घुगे यांनी इतका टोकाचा निर्णय का घेतला? हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी माहिती पुढे आली आहे. मात्र, नेमकं कारण अजून स्पष्ट नाही.